गजरे विकणारास पुन्हा संधी

By Admin | Updated: October 19, 2014 22:55 IST2014-10-19T22:55:07+5:302014-10-19T22:55:07+5:30

१९९५ मध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीची लाट होती़ त्या वेळी पर्वती मतदारसंघातून स्वारगेट एसटी स्टँडवर गजरे विकणारा आणि सायकलवर फिरणा-या दिलीप कांबळे यांना भाजपने उमेदवारी दिली़

Guswant again chance | गजरे विकणारास पुन्हा संधी

गजरे विकणारास पुन्हा संधी

पुणे : १९९५ मध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीची लाट होती़ त्या वेळी पर्वती मतदारसंघातून स्वारगेट एसटी स्टँडवर गजरे विकणारा आणि सायकलवर फिरणा-या दिलीप कांबळे यांना भाजपने उमेदवारी दिली़ तेव्हा भाजपने गजरे विकणारा दिलीप जाणार विधानसभेत असा प्रचार केला होता़ त्याचा मतदारांवर इतका परिणाम झाला की युतीच्या लाटेत दिलीप कांबळे हे निवडून आले आणि पहिल्या युतीच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थानही मिळाले होते़
१९९९ मध्ये त्यांना पक्षाने तिकीट दिले नाही़ तरी ते पक्षाचे काम करीत राहिले़ त्यानंतर २००४ मध्ये त्यांच्या मूळ गावी माळशिरसला उमेदवारी दिली मात्र त्यांना यश येऊ आले नाही़ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे १९८० ते १९८५ मध्ये काम करीत असतानाच त्यांनी भाजपचे काम केले़ प्रचाराचे काही दिवसानंतर त्यांना योग्य गती मिळाली. त्यातच मोदीलाटेचा फायदा होऊन त्यांचा विजय सुकर झाला़ दिलीप कांबळे विजयी होताच जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा १९९५ मधील गजरे विकणारा विधानसभेत जाणार या घोषणेची आठवण झाली़ सध्या कांबळे मंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Guswant again chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.