शिष्यांची गुरुवंदना!

By Admin | Updated: December 25, 2015 01:40 IST2015-12-25T01:40:07+5:302015-12-25T01:40:07+5:30

तब्बल ४० शिष्यांचे सतार वादन, देश-परदेशातील कलावंतांचे पारंपरिक व समकालीन नृत्याचे सादरीकरण तसेच सांगीतिक क्षेत्रातील जीवनपट उलगडून दाखविणारी चित्रफित अशा अनोख्या

Gurupandana of the disciples! | शिष्यांची गुरुवंदना!

शिष्यांची गुरुवंदना!

पुणे : तब्बल ४० शिष्यांचे सतार वादन, देश-परदेशातील कलावंतांचे पारंपरिक व समकालीन नृत्याचे सादरीकरण तसेच सांगीतिक क्षेत्रातील जीवनपट उलगडून दाखविणारी चित्रफित अशा अनोख्या सोहळ्यात ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित संगीत समारोहाला गुरुवारी सुरुवात झाली.
उस्ताद उस्मान खान यांच्या शिष्यपरिवाराने हा महोत्सव टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित केला असून दि. २६ पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता चापेकर आणि मनिषा साठे यांनी दीप प्रज्वलीत करुन केले.
नाद परिवारातर्फे आयोजित ‘अर्पण’ या महोत्सवाची सुरुवात उस्ताद उस्मान खान यांच्या ४० शिष्यांनी सादर केलेल्या सतारवादनाने झाली. यात देशविदेशातील कलावंतांचा समावेश होता. भीमपलास रागातील रचनेने सादरीकरणास सुरुवात झाली. त्यानंतर यमन, कलावती आणि किरवाणी घराण्यातील रचना सादर करण्यात आल्या. या सर्व रचना उस्ताद उस्मान खान यांनी बांधल्या होत्या. गुरुविषयी असलेले प्रेम, आदर व्यक्त करण्यात आला. प्रकाश कंदस्वामी, विघ्नेश्वरन यांनी तबल्यावर समर्पक साथ केली. (प्रतिनिधी)

Web Title: Gurupandana of the disciples!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.