जागृत करतो तो गुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:11 AM2021-07-25T04:11:28+5:302021-07-25T04:11:28+5:30

पुणे : स्वप्न न पाहता सत्य काय आहे ते दाखवून देण्याचे कार्य गुरू करतात, असे प्रतिपादन जैन संत गणिवर्य ...

The Guru awakens | जागृत करतो तो गुरू

जागृत करतो तो गुरू

Next

पुणे : स्वप्न न पाहता सत्य काय आहे ते दाखवून देण्याचे कार्य गुरू करतात, असे प्रतिपादन जैन संत गणिवर्य वैराग्यरतिविजयजी महाराज यांनी आज येथे केले. हाईड पार्क जैन मंदिरात ते गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

जैन कॅलेंडरनुसार शनिवारी मंदिर आणि स्थानकांमध्ये, गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आचार्यांचे योगदान आणि समाजासाठी महत्त्व, याबाबत गुणानुमोदन करण्यात आले.

वैराग्यरतिविजयजी महाराज म्हणाले, आपण गाढ झोपेत असतो तेव्हा माणूस स्वत:लाही विसरतो. झोपेत आपण स्वप्न पाहतो आणि त्यावेळी आपल्याला कोणीही झोपमोड केलेली आवडत नाही. मात्र, आपले शिक्षक, आचार्य, धर्मगुरू मात्र तुमची झोपमोड करून जागे करतात. त्यावेळी तुम्हाला राग येत असेल, तुमचा अहंकार दुखावला जात असेल पण एक नक्की आहे की, ते आपल्याला जागे करून जीवनातील सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात.

जैन धर्म हा व्यक्तीपूजेऐवजी गुणांच्या पूजेला महत्त्व देतो. त्यामुळेच केवळ विशिष्ट गुरूंची पूजा न करता गुणांचा समुच्चय असलेल्या सर्व व्यक्ती, शिक्षकांची पूजा करा, असा उपदेश दिला जातो. म्हणूनच नवकार महामंत्रामध्ये, व्यक्तीविशेष असे कोणाचेही नाव न घेता, आचार्य, उपाध्याय, साधू यांना नमस्कार असो, असे म्हटले आहे. ते तुम्हाला गाढ झोपेतून जागे करून सत्याचा, कर्तव्याचा मार्ग दर्शवतात. म्हणूनच गुरूंना प्रात:स्मरणीय म्हटले आहे.

...............................

चौकट

सर्वत्र गुरुवंदना

.......................

शहरातील मंदिर, स्थानकांमध्ये, गच्छाधिपती दौलतसागरजी, युवाचार्य महेंद्रऋषीजी, वाणीभूषण प्रीतिसुधाजी यांच्यासह आचार्य नंदीवर्धनसागर सुरीश्वरजी, उपप्रवर्तक तारकऋषीजी, आचार्य विमलबोधीजी,आचार्य मोक्षरतिविजयजी, धर्मानंदविजयजी, हर्षसागरसुरीजी, लाभेशविजयजी, जितेशमुनीजी, विश्वासमुनीजी, साध्वीजी मधुस्मिताजी, नमिताजी, सुमनप्रभाजी आदी साधुसंतांच्या उपस्थितीत गुरूवंदना आणि गुरूगुणगान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Web Title: The Guru awakens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.