गुंजन मावळ दुर्गसंवर्धन संघटनेची माणुसकीच्या उबेची अनोखी शिवजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:20 IST2021-02-21T04:20:11+5:302021-02-21T04:20:11+5:30

गुंजन मावळ दुर्गसंवर्धन संघटनेकडून अनोखी शिवजयंती साजरी करण्यात आली. वेल्हे तालुक्यामध्ये गेली 32 वर्षे तोरणा-राजगड परिसर समाज उन्नती ...

Gunjan Maval Fort Conservation Association's unique Shiva Jayanti of humanity | गुंजन मावळ दुर्गसंवर्धन संघटनेची माणुसकीच्या उबेची अनोखी शिवजयंती

गुंजन मावळ दुर्गसंवर्धन संघटनेची माणुसकीच्या उबेची अनोखी शिवजयंती

गुंजन मावळ दुर्गसंवर्धन संघटनेकडून अनोखी शिवजयंती साजरी करण्यात आली. वेल्हे तालुक्यामध्ये गेली 32 वर्षे तोरणा-राजगड परिसर समाज उन्नती न्यास हे तोरणा वसतिगृह तालुक्यातील दुर्गम आणि डोंगरी भागातील गरीब मुलांना शिक्षण, आरोग्य व समाजसेवेचे धडे देण्याचे व्रत हाती घेऊन काम करीत आहे. आजही या वसतिगृहाच्या माध्यमातून 27 मुले तिथे शिक्षण घेत आहेत. तर ज्ञानप्रबोधनी मुलींचे वसतिगृह इथे 32मुली शिक्षण घेत आहेत.

याच वसतिगृहाला गरज आहे ती फक्त माणुसकीच्या उबेची, यातच खारीचा वाटा म्हणून गुंजन मावळ दुर्गसंवर्धन संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वसतिगृहाला धान्य वाटप, त्यांच्या गरजेनुसार किराणा माल ,शालेय साहित्य,वाटप करण्यात आले तसेच मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप देखील वसतिगृहासोबतच वेल्हा पोलीस स्टेशनलाही यावेळी देण्यात आले. अशी ही अनोखी शिवजयंती वसतिगृहातील विद्यार्थ्यांसोबत साजरी करण्यात आली. या शिवजयंती कार्यक्रमावेळी वसतिगृहाला समीर शिळीमकर व सर्व शिक्षक वृंद तर संघटनेचे संदीप कुंभार,मकरंद शिंदे, सचिन धायगवे, सागर उफाळे, राहुल वालगुडे, ओंकार शिळीमकर, मंगेश सुतार, धनंजय भोसले, सचिन थोपटे, नितीन वालगुडे, सोनू वालगुडे, मारुती धायगावे, योगेश रेणुस, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

तोरणा वसतिगृह वेल्हे (ता. वेल्हे) वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक साहित्यांचे वाटप करताना गुंजन मावळ दुर्ग रक्षक संघटनेचे पदाधिकारी.

Web Title: Gunjan Maval Fort Conservation Association's unique Shiva Jayanti of humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.