गुंडगिरी,माफियाराज मुळासकट उखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:09 IST2021-03-27T04:09:53+5:302021-03-27T04:09:53+5:30

वाघोली :लोणीकंद पोलीस स्टेशनचा आता पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समावेश झाला असल्याने पुणे शहरासारख्या तात्काळ सुविधा याठिकाणी मिळणार असून ...

Gundgiri, Mafia Raj will be uprooted | गुंडगिरी,माफियाराज मुळासकट उखडणार

गुंडगिरी,माफियाराज मुळासकट उखडणार

वाघोली :लोणीकंद पोलीस स्टेशनचा आता पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समावेश झाला असल्याने पुणे शहरासारख्या तात्काळ सुविधा याठिकाणी मिळणार असून नागरिकांवर,तक्रारदारावर दबाव आणणे,धमकी देणे आदी प्रकार सहन केले जाणार नसून यापुढे मिलीजुली सरकार चालणार नाही असा इशारा शहर पोलीस दल झोन ४ चे डीसीपी (उपायुक्त) पंकज देशमुख यांनी सज्जड दम दिला आहे. सक्ती करणाऱ्या टँकर माफिया सारख्या इतर सर्वच माफियांशी हितसंबंध मुळासकट उखडून टाकणार आहे.लोणीकंद (ता:हवेली) पोलीस ठाण्याचा पुणे शहर पोलीस दलात समावेश झाल्यानंतर येथील लोकप्रतिनिधी व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी वाघोली येथे बैठक घेण्यात आली होती.यावेळी नागरिकांनी लोणीकंद पोलीस ठाण्याला ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असल्याने शहर पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी अशी मागणी केली.यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार,येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा शिवदास उबाळे, रामभाऊ दाभाडे, राजेंद्र सातव,दादासाहेब सातव,चंद्रकांत कोलते, लोचन शिवले,शांताराम कटके,वाघोली व परिसरातील लोकप्रतिनिधी व यावेळी नागरिक उपस्थित होते. वाघोलीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करावी,पोलिसांना राहण्यासाठी वसाहत करावी, कडक वाहतूक नियमावली राबवावी,पैशासाठी नागरिकांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी,महत्वाच्या ठिकाणी पोलीस चौक्या उभाराव्यात,वाघोली पोलीस स्टेशन स्वतंत्र करावे,भाड्याने राहणाऱ्या नागरिकांची माहिती घ्यावी अशा विविध सूचना उपस्थित नागरिकांनी केल्या.यावेळी पंकज देशमुख म्हणाले कि,पुणे शहराप्रमाणे लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसिंग राबविली जाईल.नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस २४ तास उपलब्ध असतील.लोणीकंद पोलीस ठाण्यास चारचाकी २ गाड्या, बीट मार्शलसाठी ३ दुचाकी देण्यात आल्या आहेत. कोंडीवरील नियंत्रणासाठी एक अधिकारी व १० कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र युनिट कार्यरत असणार आहे.पोलीस ठाण्यास अधिकचे ४ अधिकारी व १५ पोलीस कर्मचारी देण्यात आले आहेत.जवळपास १०० कर्मचारी दिले जातील.ग्रामीण भागामध्ये आवश्यक ठिकाणी ४ ते ५ पोलीस चौक्या उभारण्यात येतील.लोणीकंद मधून स्वतंत्र वाघोली पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर याठिकाणी देखील अशाच सुविधा देण्यात येईल.

**************

नागरिकांवर दबाव आणणे,खंडणीची मागणी करणे, वेठीस धरणे,मारण्याची भीती दाखविणे असे प्रकार पुणे शहर पोलीस यापुढे खपवून घेणार नाहीत.अशा प्रकारचे हितसंबंध ,गुंडगिरी,दादागिरी मुळासकट उखडून टाकली जाईल. - पंकज देशमुख, डीसीपी.४झोन

***********************

पुणे शहर पोलिस नागरिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी आले आहेत. तळागाळातील नागरिकांचे प्रश्न ऐकल्या शिवाय कोणताच मार्ग निघत नाही.त्यामुळे या बैठकीतून अधिकारी नक्कीच चांगला मार्ग काढतील आणि चांगले पोलिसिंग आपल्याला अनुभवास मिळेल.

अशोक पवार, आमदार

Web Title: Gundgiri, Mafia Raj will be uprooted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.