शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेमध्ये पिस्तूलधारकांचा वावर वाढला, मिळकत कर थकबाकी प्रकरणी एकाने स्वतःच्याच डोक्याला लावली पिस्तूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 01:34 IST

या घटनेची महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून संबंधीतावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

पुणे : महापालिकेचे नवे सभागृह अस्तित्वात आल्यानंतर महापालिकेत नवख्या नगरसेवकांचा आणि त्यांच्या नवनवीन वाहनांचा जसा वावर वाढला आहे, तसाच पिस्तूल बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांचाही वावर वाढला आहे. मिळकत कर थकबाकी प्रकरणी महापालिकेत चकरा मारणाऱ्या एकाने पिस्तूल काढून थेट स्वत:च्या डोक्याला लावल्याची घटना शुक्रवारी दुपारी महापालिकेतील मिळकत कर विभागाच्या कार्यालयात घडली.या घटनेची महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून संबंधीतावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. महापालिकेतील चार वर्षाच्या प्रशासकराज नंतर नुकतेच महापालिका सभागृह अस्तित्वात आले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत १६५ पैकी जवळपास शंभर नगरसेवक नवखे असून पहिल्यांदाच महापालिकेच्या सभागृहात पोहचले आहेत. नवीन नगरसेवकांमध्ये काही गुंठा मंत्र्यांचाही समावेश असल्याने ते आणि त्यांचे कार्यकर्ते महागड्या गाड्यांमधून महापालिकेत येतात. त्यामुळे महापालिकेच्या परिसरात नवनवीन आणि महागड्या गाड्यांचा वावर दिसतो. एकीकडे हे चित्र असताना, दुसरीकडे पिस्तूलधारक कार्यकर्त्यांचाही वावर वाढलेला दिसत आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीवेळी काही कार्यकर्त्यांच्या कमरेला पिस्तूल सदृष्य वस्तू पहायला मिळाल्या.

त्यानंतर आता शुक्रवारी तर महापालिकेच्या मिळकत कर विभागात एकाने स्वत:च्या डोक्यालाच पिस्तूल लावल्याची घटना घडली. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तिचे कोंढवा-वानवडी भागात मंगल कार्यालय आहे. ते त्याने पाडून टाकले आहे. यानंतर मोकळ्या जागेचा कर लावण्यासाठी त्याने मिळकत कर विभागाकडे अर्ज केला होता. त्यानुसार प्रस्ताव तयार करून त्याला अतिरिक्त आयुक्तांनी मान्यता देखिल दिली होती. हे बील काढण्याची प्रक्रिया सुरू असताना शुक्रवारी तो व्यक्ती महापालिका भवनमधील बिल विभागात गेला होता. नवीन बिलाबाबत त्यांना संबधित महिला कर्मचारी माहिती देत असतानाच त्याने कमरेचे पिस्तूल काढून स्वत:च्या डोक्याला लावत आता मी गोळी मारून घेउ का? अशी धमकीवजा संताप व्यक्त केला. यामुळे तेथे असलेले कर्मचारी घाबरले. तातडीने इतर अधिकार्यांना बोलावून घेण्यात आले. तिथे उपस्थित असलेल्यांनी त्यांना यापासून प्रवृत्त करत बाजूला नेले.

दरम्यान, या प्रकाराची महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गांभीर दखल घेतली असून त्यांनी संबंधीत व्यक्तीच्या प्रस्तावाची माहिती घेतली. या प्रस्तावात सर्वच अधिकारी स्तरावरून निगेटीव्ह अभिप्राय आले होते. परंतू यातून लवकर मार्ग काढू असे अधिकार्यांनी त्यांना सांगितले होते. त्यानंतर संबंधिताने डोक्याला पिस्तूल लावल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्यासाठी पोलिसांना कळविणार असल्याचे सांगितले. दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांनी संबंधीत व्यक्तीची रितसर तक्रार दिली असून रात्री उशीरापर्यंत संबंधीतावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, असे परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी सांगितले.कोट महापालिका भवनमध्ये पिस्तूल आणणे आणि तो डोक्याला लावणे हा गंभीर प्रकार आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात येणार असून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर मशिन बसवून येणाऱ्यांची व त्यांच्या गाड्यांची तपासणी करण्यात येईल. तसेच महापालिका प्रवेशद्वार व भवनाचील सुरक्षा कडक केली जाईल.- नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका.अभय योजनेचा शेवटचा दिवस असल्यामुळे ही व्यक्ती महापलिकेत कर भरण्यासाठी आली होती. कराची रक्कम पाहिल्यानंतर या व्यक्तीने हायपर होवून जीवाचे बरेवाईट करतो म्हणून पिस्तूल डोक्याला लावले. पोलिसात यासंदर्भात तक्रार देण्यात आली आहे.- राकेश विटकर, सुरक्षा विभाग प्रमुख, महापालिका 

English
हिंदी सारांश
Web Title : Pistol brandished at Pune Municipal Corporation over property tax dispute.

Web Summary : A man brandished a pistol at Pune Municipal Corporation over property tax. Officials ordered a police complaint and revoked his gun license. Security will be heightened.
टॅग्स :Puneपुणे