गुलाबराव म्हाळसकरांची बिनविरोध निवड
By Admin | Updated: March 15, 2017 03:21 IST2017-03-15T03:21:28+5:302017-03-15T03:21:28+5:30
मावळ पंचायत समितीच्या २१व्या सभापतिपदी भाजपाच्या गुलाबराव म्हाळसकर यांची बिनविरोध निवड झाली, तर उपसभापतिपदी शांताराम कदम यांची वर्णी लागली आहे.

गुलाबराव म्हाळसकरांची बिनविरोध निवड
वडगाव मावळ : मावळ पंचायत समितीच्या २१व्या सभापतिपदी भाजपाच्या गुलाबराव म्हाळसकर यांची बिनविरोध निवड झाली, तर उपसभापतिपदी शांताराम कदम यांची वर्णी लागली आहे.
पीठासन अधिकारी सुभाष बागडे यांच्या उपस्थितीत सभापती आणि उपसभापती या पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. सभापतिपद हे नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे या पदासाठी भाजपाकडून गुलाबराव म्हाळसकर यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. तर उपसभापतिपदासाठी कदम, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून राजश्री संतोष राऊत यांनी अर्ज दाखल केल्यामुळे उपसभापतिपदासाठी निवडणूक झाली. दुपारी दोननंतर उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. यामध्ये पंचायत समितीमध्ये भाजपाचे ६, तर राष्ट्रवादीचे ४ सदस्य असल्याने हात उंचावून मतदान घेतले. यात राष्ट्रवादीच्या राजश्री राऊत यांना चार, तर शांताराम कदम यांना सहा मते पडल्यामुळे शांताराम कदम यांची उपसभापतिपदी निवड जाहीर केली. (वार्ताहर)