शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात...
2
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
3
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
4
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
5
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
6
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
7
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
8
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
9
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
10
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
11
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
12
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
13
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
14
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
15
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
16
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
17
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
18
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
19
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
20
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...

शिस्तबद्ध संचलनाने जिंकली मने! एनडीएचे दीक्षांत संचलन; सुखोई आणि मिराज विमानांची सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 04:38 IST

तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण घेत देशापुढील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) १३३ व्या तुकडीचा शानदार शिस्तबद्ध दीक्षांत संचलन सोहळा गुरूवारी पार पडला.

पुणे : तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण घेत देशापुढील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) १३३ व्या तुकडीचा शानदार शिस्तबद्ध दीक्षांत संचलन सोहळा गुरूवारी पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. कॅडेट कॅप्टन अर्जून ठाकूर याने या संचलनाचे नेतृत्त्व केले.किर्गिझस्थान रिपब्लिकच्या लष्कराचे चीफ आॅफ आर्मी स्टाफ मेजर जनरल राइमबरदी दुइशनबीएव्ह या संचलाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी लष्कराच्या दक्षिण कमांडचे लेफ्टनंट जनरल पी.एम. हारीस, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमाडंन्ट एयर मार्शल जसजीत सिंग क्लेर, प्रबोधनीचे उपप्रमुख रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्ला, प्राध्यापक, प्रशिक्षक तसेच तिन्ही सेना दलातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. विशेष निमंत्रित अभिनेते नाना पाटेकर सोहळ्याचे आकर्षण बनले होते.या वेळी मेजर जनरल राइमबरदी दुइशनबीएव्ह आणि एयर मार्शल जसजीत सिंग क्लेर यांनी संचलनाची पाहणी करून विद्यार्थ्यांची मानवंदना स्वीकारली. यानंतर प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथकाच्या शिस्त आणि तालबद्ध वादनावर कॅडेट्सनी मार्च केले. कॅडेट कॅप्टन अर्जून ठाकूर याने तिन्ही वर्षात केलेल्या कामगिरीबद्दल त्याला राष्ट्रपती सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले. डिव्हीजनल कॅडेट कॅप्टन राहुल बिष्ट याला रौप्य पदक, तर बटालियन कॅडेट कॅप्टन शशांक शेखर याला कांस्य पदकाने सन्मानित करण्यात आले. चीफ आॅफ स्टाफ बॅनरचा मानकरी ‘एन’ स्कॉडर्न ठरली. संचलनात एकूण २५० कॅडेटनी सहभाग घेतला. यातील १५२ छात्र लष्कराचे, २७ छात्र नौदलाचे आणि १७ छात्र हवाईदलातील होते.चिता, सुखोई, मिराज विमानांची सलामीसंचलन सुरू असताना प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यासाठी लष्कराच्या चिता हेलिकॉप्टरद्वारे सलामी देण्यात आली. हवाईदलाच्या तीन सुखोई आणि मिराज विमानांनी विद्यार्थ्यांना सलामी दिली.‘सूर्यकिरण’ची प्रात्यक्षिके डोळे दिपवणारीएनडीएच्या १३३व्या दीक्षांत सोहळ्याच्या निमित्ताने सूर्यकिरण फॉरमेशन एरोबॅटिक टीमने सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. कसरतींची मालिका सादर होत असताना उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकत होता. एकूण ९ विमानांनी ही प्रात्यक्षिके सादर केली.

टॅग्स :nda puneएनडीए पुणेPuneपुणेIndiaभारत