शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:09 IST2021-05-22T04:09:27+5:302021-05-22T04:09:27+5:30
कृषी सेवा रुग्णवाहिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामधील चालू पिकातील कीड, रोग, व्हायरस, थ्रीप्स, पांढरी माशी, हुमणी कीड इ.पासून होणाऱ्या ...

शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन
कृषी सेवा रुग्णवाहिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामधील चालू पिकातील कीड, रोग, व्हायरस, थ्रीप्स, पांढरी माशी, हुमणी कीड इ.पासून होणाऱ्या रोगाबद्दल योग्य व समर्पक मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्रामुख्याने शेवगा, टोमॅटो, फ्लॉवर, झेंडू इ. पिकामधील रोग कीड व्यवस्थापन याविषयी फवारणी, खते, चिकट सापळे लावणे व कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन क्षमता वाढवणे, जैविक लिक्विड खतांची (ट्रायकोटर्म, सुडोमानस, केएमबी, पीएसबी) ड्रीपद्वारे द्यावयाची लिक्विड खते याबद्दल माहिती दिली.
साधारणपणे १५ ते २० दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीने शेतीपिकांचे झालेले नुकसानीची पाहणी करून पुनःश्च खते, औषधे पिकाची वाढ होईल असे योग्य मार्गदर्शन केले.
यावेळी प्रगतीशील शेतकरी नितीन शेवाळे, शाम गुंजाळ, लक्ष्मण बोंबले, सोमनाथ गुंजाळ यांच्या शेतावर प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले. या उपक्रमासाठी माजी उपसरपंच राजेंद्र शेवाळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पाडला.
२१ मंचर कृषी