वडापुरीतील शेतकऱ्यांना ठिबक सिंचन वापराचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST2021-07-23T04:08:29+5:302021-07-23T04:08:29+5:30

रत्नाई कृषी महाविद्यालयातील, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अकलूज येथील कृषी कन्या अमृता लालासाहेब शिर्के यांनी शेतातील ...

Guidance on drip irrigation use to farmers in Vadapuri | वडापुरीतील शेतकऱ्यांना ठिबक सिंचन वापराचे मार्गदर्शन

वडापुरीतील शेतकऱ्यांना ठिबक सिंचन वापराचे मार्गदर्शन

रत्नाई कृषी महाविद्यालयातील, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अकलूज येथील कृषी कन्या अमृता लालासाहेब शिर्के यांनी शेतातील ठिबक सिंचन व तुषार सिंचन आधुनिक पद्धतीचा वापर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात करावा यासाठी मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.

सततचे वातावरणात होणारे बदल, पावसाची अनियमितता, पाण्याची कमतरता, यासारख्या अनेक गंभीर नैसर्गिक समस्यांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. याचा खूप मोठा परिणाम पी. उत्पादनावर होवून, शेतपिकात मोठी तफावत आढळून उत्पन्नात कमालीची घट होते. आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करून शेतकरी अतिशय अत्यल्प कष्ट व पाणी वापरून भरघोस उत्पन्न मिळवू शकतो, असेही शिर्के यांनी सांगितले.

अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी. कोरटकर, प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. आर. राऊत, प्रा. ए. बी. तमनार, प्रा. ए. एम. चंदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीपूरक उपक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी श्रीकांत पवार, शहाजी पवार, भगवान शिर्के, रामदास पवार व इतर शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Guidance on drip irrigation use to farmers in Vadapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.