शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

गुढीपाडव्यामुळे फुलांच्या दरात ५० टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 9:01 PM

मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरांची व दुकानांची सजावट केली जाते.त्यामुळे झेंडू,गुलछडी,बिजली आदी फुलांना चांगलीच मागणी असते

ठळक मुद्देशनिवारी फुल बाजारात पुण्यासह सातारा,सोलापूर जिल्ह्यातून फुलांची मोठी आवक

पुणे: गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फुल बाजारात गुढीपाडव्यामुळे फुलांची मोठी आवक झाली.फुलांना मागणी असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या दरात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झाली.त्यामुळे पाडव्यासाठी राखून ठेवलेल्या फुलांना अधिक दर मिळाल्याने शेतक-यांचा फायदा झाला.मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरांची व दुकानांची सजावट केली जाते.त्यामुळे झेंडू,गुलछडी,बिजली आदी फुलांना चांगलीच मागणी असते.पाडव्यामुळे काही शेतक-यांनी गेल्या आठवड्यात फुलांची तोड केली नाही.त्यामुळे मागील आठवड्यात फुलांची कमी आवक झाली.परंतु,शनिवारी फुल बाजारात पुण्यासह सातारा,सोलापूर जिल्ह्यातून फुलांची मोठी आवक झाली.फुलांचे व्यापारी सागर भोसले म्हणाले,गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.शनिवारी तरकारी बाजार बंद असल्याने फुलांची फारशी आवक होत नाही.परंतु,गुढीपाडव्यामुळे शनिवारी चांगली आवक झाली.त्यात झेंडूला एका किलोला २० ते ६० रुपये, गुलछडीला १६० ते ३०० रुपये ,मोग-याला ५०० ते ६०० रुपये,बिजलीला २० ते ६० रुपये तर लिली बंडलला १० ते १५ रुपये दर मिळाला.बाजार समितीच्या फुल विभागाचे मंगेश पठारे म्हणाले,यंदा चांगला पाऊस झाल्याने फुलाचे उत्पादन वाढले आहे.त्यामुळे रविवारी झेंडूची ७० हजार,गुलछडीची  ३ .७५ हजार तर ७७५ किलो मोग-याची आणि ६ हजार किलो बिजलीची आवक झाली.परंतु,गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा झेंडूला कमी दर मिळाला.मागील वर्षी झेंडूला ८० ते १०० रुपये दर मिळाला होता.----------फुलांचे एका किलोचे दर झेंडू : २० ते ६० रुपये मोगरा: ५०० ते ६०० रुपये गुलछडी: १६० ते ३०० रुपये 

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्ड