शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांना सोडून सांगलीचे पालकमंत्री पुण्यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 20:55 IST

पुरग्रस्तांना सोडून मी पुण्यात आल्याच्या चर्चांमध्ये अर्थ नाही...

ठळक मुद्देसुभाष देशमुखांची पक्ष बैठकीत उपस्थिती

पुणे : पुरात अडकलेल्या सांगलीला वाऱ्यावर सोडून सांगलीचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बैठकीला गुरूवारी (दि. ८) उपस्थित राहिले. यावेळी मतदारांबरोबर संपर्क कसा ठेवायचा याबद्दल बूथकेंद्र कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक होती.विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डीपी रस्त्यावरील एका कार्यालयात ही बैठक झाली. पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे संघटनात्मक पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. देशमुख यांच्याकडे भाजपात पुणे शहराचे प्रभारी म्हणून संघटनात्मक जबाबदारी आहे. मात्र ते पालकमंत्री असलेली सांगली सध्या अभुतपूर्व पुरात बुडालेली आहे. गुरुवारीच सांगलीत बोट बुडून नागरिकांच्या मृत्यूची दुर्घटना घडली. सांगलीकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून पिण्याचे पाणी, वीज, अन्न, निवारा या मुलभूत गरजांसाठी त्यांचा संघर्ष चालू आहे. अशावेळी सांगलीकरांचे दु:ख हलके करण्यासाठी सांगलीत उपस्थित राहण्याऐवजी पुण्यातल्या भाजपाच्या बैठकीला देशमुखांनी प्राधान्य दिले. भाजपाचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी या बैठकीत शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्याकडून पुण्यातील संघटनेच्या कामकाजाची माहिती घेतली. खासदार गिरीश बापट यांच्यासह पुण्यातील भाजपाचे सहाही आमदार तसेच प्श्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, महापौर मुक्ता टिळक, प्रदेश चिटणीस धीरज घाटे आदी यावेळी उपस्थित होते.शक्तीकेंद्र प्रमुख, त्यांच्या कामाची पद्धत, बैठक, बूथ समितीचे कामकाज, सरकारच्या योजना मतदारांपर्यंत पोहोचविणे, बूथप्रमुखांची २३ कामे, शक्तीकेंद्र प्रमुखांची ११ कामे, पक्षाचे कार्यक्रम याचा आढावा पुराणिकांनी घेतला. प्रत्येक मतदाराच्या नियमीत संपर्कात राहण्याची सवय बूथ पदाधिकाऱ्यांनी लावून घ्यावी, मतदारयादीचे अभ्यासपुर्वक विश्लेषण करावे अशा सुचनाही त्यांनी दिल्या. गोगावले यांनी बैठकीचे सुत्रसंचालन केले. 

सांगलीतूनच आलोपक्षाच्या बैठकीनंतर सुभाष देशमुख यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतलेल्या पूर आढावा बैठकीस उपस्थिती लावली. यावेळी पत्रकारांनी त्यांना सांगलीतील अनुपस्थितीबद्दल छेडले असता देशमुख म्हणाले, सांगलीतील सरकारी यंत्रणेच्या मी सातत्याने संपर्कात आहे. आज सकाळीच मी तिथून पुण्यात आलो. संध्याकाळी पुन्हा सांगलीलाच जाणार आहे. पूरग्रस्तांसाठी मदत मिळवण्यासाठी मी पुण्यात आलो होतो. पुरग्रस्तांना सोडून मी पुण्यात आल्याच्या चर्चांमध्ये अर्थ नाही. ...........

टॅग्स :Puneपुणेfloodपूरkolhapurकोल्हापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख