वाहतूक विभागावर पालकमंत्री नाराज

By Admin | Updated: February 8, 2016 02:19 IST2016-02-08T02:19:09+5:302016-02-08T02:19:09+5:30

शहरामध्ये हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सुरू करण्यापूर्वी पालकमंत्री म्हणून माझ्याशी वाहतूक पोलिसांनी कोणतीही चर्चा केली नाही.

Guardian Minister angry on the Department of Traffic | वाहतूक विभागावर पालकमंत्री नाराज

वाहतूक विभागावर पालकमंत्री नाराज

पुणे : शहरामध्ये हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सुरू करण्यापूर्वी पालकमंत्री म्हणून माझ्याशी वाहतूक पोलिसांनी कोणतीही चर्चा केली नाही. हेल्मेटसक्ती करण्यापूर्वी दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याची बातमी वाचायला मिळाली असती तर आनंद झाला असता, अशी भावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली. कोणतीही चर्चा न करता हेल्मेटसक्ती लागू केल्यामुळे सरकारची चेष्टा झाली, असे खासदार अनिल शिरोळे म्हणाले.
शहरामध्ये गेल्या ३ दिवसांपासून हेल्मेटसक्ती लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, आमदार नीलम गोऱ्हे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, लक्ष्मण जगताप, पोलीस आयुक्त के. के. पाठक, पोलीस अधीक्षक जय जाधव, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण, मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे, राष्ट्रवादी काँगेस प्रवक्ते अंकुश काकडे, हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, नगरसेविका रूपाली पाटील, बाळासाहेब रूणवाल, संदीप खर्डेकर, विवेक वेलणकर, शैलेश गुजर, प्रदीप निफाडकर, शिवा मंत्री उपस्थित होते.
बापट म्हणाले, ‘‘हेल्मेटसक्तीचा विषय जुना असून तो व्यवस्थित सोडविला पाहिजे. हेल्मेटला विरोध नाही, मात्र त्याबाबत प्रश्न आहेत. पुण्यात आम्ही मोठे रस्ते करू
शकलो नाही. महामार्गांवर दुचाकी चालविताना हेल्मेट घातलेच
पाहिजे. सक्ती करण्यापूर्वी प्रबोधन केले पाहिजे.’’

Web Title: Guardian Minister angry on the Department of Traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.