शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

पैसे भरण्याची हमी द्या, अन्यथा शरण जा, उच्च न्यायालयाची डीएसकेंना तंबी, ४ डिसेंबरपर्यंत दिली मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 6:03 AM

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिगंबर कुलकर्णी उर्फ डीएसके यांना ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यासंदर्भात सोमवारपर्यंत हमीपत्र देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. सोमवारपर्यंत हमीपत्र दिले नाही, तर पोलिसांना शरण जा.

मुंबई : पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिगंबर कुलकर्णी उर्फ डीएसके यांना ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यासंदर्भात सोमवारपर्यंत हमीपत्र देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. सोमवारपर्यंत हमीपत्र दिले नाही, तर पोलिसांना शरण जा. आतापर्यंत देण्यात आलेले अंतरिम संरक्षण काढून घेण्यात येईल, अशी तंबीच न्यायालयाने डीएसके दाम्पत्याला दिली आहे.गुंतवणूकदारांची थकीत रक्कम परत करण्यासाठी कोणत्या मालमत्ता विकणार? याची यादी न्यायालयाने डीएसकेंना सादर करण्याचे निर्देश गेल्या सुनावणीत दिले होते. त्यानुसार, गुरुवारच्या सुनावणीत डीएसकेंनी सातारा, अहमदनगर, पुण्याचे डीएसके ड्रीम (फुरसुंगी), केगाव, सोलापूर येथील मालमत्ता विकण्याची तयारी न्यायालयात दर्शवली. मात्र या सर्व मालमत्तांवर आधीच कर्ज घेण्यात आले असल्याने, ज्या मालमत्तांवर कर्ज घेण्यात आले नाही, अशा मालमत्तांची यादी द्या, असे न्या. अजय गडकरी यांनी म्हटले. मात्र, अशी एकही मालमत्ता नसल्याचे डीएसकेंचे वकील अशोक मुंदर्गी यांनी न्यायालयाला सांगितले.कर्ज घेतलेल्या मालमत्ता विकण्यापूर्वी संबंधित प्राधिकरणाकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र घ्या, अशी सूचना न्यायालयाने डीएसकेंना केली. गुंतवणूकदारांचे पैसे किती दिवसांत परत करणार, अशी विचारणा न्यायालयाने केल्यावर डीएसकेंच्या वकिलांनी काहीच उत्तर दिले नाही. सर्व मालमत्तांची कागदपत्रे पोलिसांकडे आहेत, तसेच मालमत्ता खरेदी करणाºयावर हे अवलंबून आहे, असे मुंदर्गी यांनी न्यायालयाला सांगितले.त्यावर न्यायालयाने नाराजी दर्शवली. ‘आधी एकूण बुडविलेल्या रकमेच्या २५ टक्के रक्कम जमा करा. ती कधी जमा करणार, यासंदर्भात सोमवारी हमीपत्र द्या; अन्यथा पोलिसांना शरण जा. कारण हमीपत्र न दिल्यास न्यायालयाने दिलेले अंतरिम संरक्षण काढून घेण्यात येईल,’ असे न्या. गडकरी यांनी स्पष्ट केले.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, डीएसकेंनी गुंतवणूकदारांचे २०० कोटी रुपये बुडविले आहेत. या रकमेच्या २५ टक्के रक्कम म्हणजे ५० कोटी रुपये डीएसकेंना जमा करावे लागणार आहेत.गेले कित्येक महिने ठेवीदार त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर भल्या मोठ्या रांगा लावत आहेत. त्यामध्ये निवृत्त झालेल्या लोकांचा जास्त सहभाग आहे. सुमारे १७० नागरिकांनी डीएसकेच्या फिक्स डिपॉझिट स्किममध्ये पैसे गुंतवले आहेत. मात्र पैसे मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. डीएसकेंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली होती.मालमत्ता विकण्याची तयारी दर्शविलीगुरुवारच्या सुनावणीत डीएसकेंनी सातारा, अहमदनगर, पुण्याचे डीएसके ड्रीम (फुरसुंगी), केगाव, सोलापूर येथील मालमत्ता विकण्याची तयारी न्यायालयात दर्शवली. मात्र या सर्व मालमत्तांवर आधीच कर्ज घेण्यात आले आहे. त्यामुळे ज्या मालमत्तांवर कर्ज घेण्यात आलेले नाही, अशा सर्व मालमत्तांची यादी द्या, असे न्या. अजय गडकरी यांनी म्हटले. मात्र, अशी एकही मालमत्ता नसल्याचे डीएसकेंचे वकील अशोक मुंदर्गी यांनी न्यायालयाला सांगितले. डीएसके यांना ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यासंदर्भात सोमवारपर्यंत हमीपत्र देण्याचे निर्देश यावेळी उच्च न्यायालयाने दिले. सोमवारपर्यंत हमीपत्र दिले नाही, तर पोलिसांना शरण जा, अशी तंबी दिली.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणे