शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

केरोसीनसाठी द्यावे लागणार हमीपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 21:13 IST

राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत तब्बल ८८ लाख शिधापत्रिकाधारकांना केरोसिन वितरीत करण्यात येते.

ठळक मुद्देराज्य सरकारचा निर्णय : दुकानदारांना ई पॉस यंत्राद्वारे केरोसीन वितरण बंधनकारक३६ हजार दुकानांतून केवळ केरोसिन आणि २३ हजार रास्तभाव दुकानांतून धान्य आणि केरोसिनचे वाटपबिगरगॅसजोडणी शिधापत्रिकेवरील किमान एका सदस्याच आधार क्रमांक दिला असल्यास त्यांना केरोसीन वितरीत

पुणे : गॅसजोड नसणाऱ्या शिधापत्रिकाधारकांनाच केरोसिन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी दुकानदारांना ई पॉस (पॉईंट आॅफ सेल) यंत्राचा वापर करण्याचे आदेश दिले असून, केरोसिन वितरीत करण्यात येणाऱ्या  व्यक्तींकडून गॅसजोड नसल्याचे हमीपत्र घेण्याचा आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने काढला आहे.राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत तब्बल ८८ लाख शिधापत्रिकाधारकांना केरोसिन वितरीत करण्यात येते. त्यासाठी ५९ हजार ५३५ केरोसिन परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातील ३६ हजार दुकानांतून केवळ केरोसिन आणि २३ हजार रास्तभाव दुकानांतून धान्य आणि केरोसिनचे वाटप केले जाते. सर्वाजनिक वितरण प्रणालीतून दिले जाणारे केरोसिन केवळ गॅसजोड नसलेल्यांनाच देण्यात येते. खऱ्या लाभार्थ्यांनाच अनुदानित केरोसीन मिळावे यासाठी मुंबई आणि ठाण्यात १ जून २०१८ पासून पॉस यंत्राद्वारे केरोसीनचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केरोसीनच्या वितरणात ३० टक्के बचत झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पीओएसद्वारे केरोसीन वितरीत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. बिगरगॅसजोडणी शिधापत्रिकेवरील किमान एका सदस्याच आधार क्रमांक दिला असल्यास त्यांना केरोसीन वितरीत करावे. आधार नसल्यास त्याचे ई केवायसी करावे, जी ठिकाणे ‘नो नेटवर्क एफपीएस’ घोषित केलेली आहेत, तेथे हमीपत्र घेऊनच केरोसीन उपलब्ध करुन द्यावे. याशिवाय पॉस यंत्राद्वारे वितरण करणाऱ्यांनीही शिधापत्रिकाधारकाकडून हमीपत्र घेणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे. सरकारने हमीपत्राचा नमुना जाहीर केला असून, त्यात शिधापत्रिकाधारकाला गॅस जोड नसल्याचे जाहीर करावे लागेल. तसेच, संबंधित माहिती चुकीची आढळल्यास मी जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार शिक्षेस पात्र असल्याचे नमूद करण्यात आले आहे.    

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार