शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात लॉकडाऊन नकोच! आठवड्याला बसतोय १० हजार कोटींचा फटका; 'एमसीसीआयए'ची विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 15:23 IST

लॉकडाउन नको मराठा चेंबर्स फॉर कॉमर्स आणि इंडस्ट्रीजची विनंती....

ठळक मुद्देकोरोनाची दुसरी लाट सर्वांसाठी घातक

पुणे: महाराष्ट्रात एक एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाली. अत्यावश्यक सेवा वगळून व्यापार, उद्योगांना बंदी घालण्यात आली. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसण्यास सुरुवात झाली आहे. संचारबंदीचे निर्बंध अजून एक महिना कायम राहिल्यास जीएसडीपी (राज्य उत्पादन) १.५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. असा अंदाज मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रीकल्चर यांच्या उद्योग निरीक्षकांनी वर्तवला आहे. 

संचारबंदीने दुकाने, व्यापार बंद झाले आहेत. त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. आठवड्याच्या निर्बंधाने राज्याला १० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे एमसीसीआय ने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे. त्यामध्ये ०.५ टक्के जीएसडीपीत घट झाली आहे. म्हणूनच संचारबंदी अजून एक महिना वाढवली तर १.५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या संचारबंदीत औद्योगिक क्षेत्रातील कामकाज एक महिन्यापेक्षा जास्त काळ थांबले होते. त्याचा परिणाम राज्याच्या महसूलावर झाला होता. 

एमसीसीआयएच्या आकडेवारीनुसार बंद ठेवल्याने नोकरदार वर्गाचा रोजगारही थांबतो. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ लागतो. सद्यस्थितीत बहुतेक औद्योगिक कंपन्या रोजगाराचे प्रमाण कमी असूनही काम करत आहेत. " सध्याच्या निर्बंधाची स्थिती आणखी तीन आठवड्यापर्यंत राहिल्यास जीएसडीपीत १.५ टक्क्यांनी घट होईल असा अंदाज आहे. कोरोनाची दुसरी लाट सर्वांसाठी घातक आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी परिणाम कमी होईल. आतापर्यंत तरी काही कारखाने आपले उत्पादन चालू ठेवू शकले आहेत. परंतु हॉटेल, रेस्टॉरंट, व्यापार, आणि प्रवास अशा क्षेत्राला हा काळ त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.” असे एमसीसीआयचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेIndiaभारतMONEYपैसाcorona virusकोरोना वायरस बातम्या