शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ‘बेस्ट बिफोर’ टॅगच्या अंमलबजावणीमुळे वाढतोय मिठाईचा गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 13:01 IST

‘लोकमत’ पाहणीमध्ये मागील २० दिवसांतच ७० टक्के दुकानदारांनी लावली ‘बेस्ट बिफोर’ची माहिती...

ठळक मुद्देभारतीय खाद्य सुरक्षा मानके संस्थेतर्फे मिठाईचा ताजेपणा नमूद करण्याचे बंधन  ‘बेस्ट बिफोर’ तारखेच्या आत मिठाई संपली नाही तर ठेवली जाते ताजी मिठाई

पुणे : मिठाईच्या दुकानातील सर्व प्रकारच्या मिठाईच्या ट्रेला ‘बेस्ट बिफोर’चा टॅग लागु लागल्याने मिठाईचा गोडवा वाढू लागला आहे. मिठाई किती दिवस टिकणार ही तारीख असल्याने ग्राहकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच मिठाई दुकानदारांकडूनही शासन आदेशाप्रमाणे ही माहिती लावण्यास सुरूवात केली आहे. ‘लोकमत’ पाहणीमध्ये मागील २० दिवसांतच ७० टक्के दुकानदारांनी ही माहिती लावल्याचे आढळून आले.

भारतीय खाद्य सुरक्षा मानके संस्थेतर्फे मिठाईचा ताजेपणा नमुद करण्याचे बंधन मिठाई दुकानदारांवर घातले आहे. त्याची अंमलबजावणी दि. १ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. याअनुषंगाने ‘लोकमत’ने शहराच्या विविध भागातील १९ मिठाई दुकानांमध्ये जाऊन पाहणी केली. यामध्ये दुकानारांमध्ये जनजागृती झाल्याचे दिसून आले. एकुण १३ दुकानांमध्ये मिठाई कधीपर्यंत खाण्यास योग्य आहे, याची तारीख नमुद केल्याचे आढळून आले. दोन दुकानांमध्ये तर मिठाई तयार कधी केली आणि ती किती दिवस टिकेल, या दोन्ही तारखा नमुद करण्यात आल्या होत्या. काही छोट्या दुकानांनी मात्र याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. स्टीकर छापायला टाकले असल्याचे दोन दुकानदारांनी सांगितले. तर इतरांनी लावणार असल्याचे उत्तर देत अधिक बोलणे टाळले.

 ‘बेस्ट बिफोर’ तारखेच्या आत मिठाई संपली नाही तर ताजी मिठाई ठेवली जाते. त्यानुसार तारीख लावली जात असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. एका विक्रेत्याने मात्र नाराजीचा सुर लावत या प्रक्रियेला विरोध केला. काही ग्राहकांनी टॅगविषयी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. या माहितीमुळे मिठाई घरी किती दिवस टिकेल, हे कळते. तारखेपुर्वीच मिठाई खराब झाली तर दुकानदाराला जाबही विचारता येऊ शकतो, असे ग्राहकांनी सांगितले. एका ग्राहकाने मात्र माहिती तारीख नसली तरी दुकानदारावर विश्वास असल्याचे नमुद केले. काही ग्राहकांना याविषयी माहिती नसल्याचे आढळून आले. टॅगविषयी काहीही तक्रार न करता ते मिठाई खरेदी करत होते.-----------------------नवीन नियमाची दुकानादारांकडून अंमलबजावणी केली जात आहे. आतापर्यंत सुमारे १२० दुकानांची पाहणी केली असून जवळपास १०० दुकानांमध्ये तारीख लावण्यात आल्याचे दिसून आले. प्रशासनासह मिठाई, फरसाण संघटनेमार्फतही सध्या जनजागृतीवर भर आहे. मात्र दि. १ नोव्हेंबरपासून माहिती न लावलेल्या दुकानांवर कारवाई सुरू केली जाणार आहे.- सुरेश देशमुख, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन---------------दुकानदारांनी नियमांनुसार माहिती लावण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक मिठावईवर लेबल लावले जात आहे. आमचा याला विरोध असला तरी नियमांचे पालन आम्ही करत आहोत.- श्रीकृष्ण चितळे, कार्याध्यक्ष, पुणे शहर मिठाई अ‍ॅन्ड फरसाण असोसिएशन--------------कोणती मिठाई किती दिवस खावीदुधापासून बनविलेली -२ ते ३ दिवसमैदा, ड्रायफ्रुट्स पासून बनविलेली - ८ ते १५ दिवसबेसनापासून तयार केलेली - १५ दिवसखव्यापासून बनविलेले पेढे - ३ ते ४ दिवस--------------

टॅग्स :Puneपुणेfoodअन्न