समूहजीवनच देशप्रेम
By Admin | Updated: January 24, 2017 02:35 IST2017-01-24T02:35:09+5:302017-01-24T02:35:09+5:30
सध्या राष्ट्रवादाचे वेगळंच वेडं रान माजले असून राष्ट्रगीत लागल्यावर उभे राहणे हा राष्ट्रवादाचा निकष असू शकतो का? माणसांनी

समूहजीवनच देशप्रेम
पुणे : सध्या राष्ट्रवादाचे वेगळंच वेडं रान माजले असून राष्ट्रगीत लागल्यावर उभे राहणे हा राष्ट्रवादाचा निकष असू शकतो का? माणसांनी माणसाला एकत्र करून जगणे हे खरे देशावरील प्रेम असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले.
अग्निपंख आयोजित युवा मराठी साहित्य संमेलनाच्या सोमवारी झालेल्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. या संमेलनाचे अध्यक्ष वीरा राठोड, महापौर प्रशांत जगताप, माजी संमेलनाध्यक्ष सचिन परब, दादासाहेब कोळपे, लक्ष्मण पडवळ, दगडू लोमटे, प्रशांत पवार, संकेत पडवळ उपस्थित होते.
रोपट्याला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून अनोख्या पद्धतीने या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
बाळ म्हणाल्या, ‘‘मुसलमानांना पाकिस्तानात पाठवायला हवे, हे हिंदूराष्ट्र आहे अशा राजकारणातील विचारांपासून तरुणांनी दूर राहायला हवे. सध्याच्या साहित्य संमेलनांमध्ये जुनीच माणसे दिसतात. त्यात तरुणांना कमी वाव असतो.’’
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथदिंडीही काढण्यात आली. विपुला बांदल व शुभम दिघे यांनी सूत्रसंचालन केले.
(प्रतिनिधी)