शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी तयार केला रक्तदात्यांची साखळी बांधणारा ‘ग्रुप’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 10:35 IST

तातडीने रक्तपुरवठा करण्यासाठी ‘ब्लड डोनर्स नेटवर्क इंडिया’ची स्थापना

- दीपक कुलकर्णी 

पुणे : ज्याची गरज कोणत्याही क्षणी आणि कुणालाही पडू शकते, ते म्हणजे रक्त... ते शहरी भागात किमान काही खटाटोप करून उपलब्ध तरी होते; पण ग्रामीण भागात तर त्याबद्दल अंधारच! मग अशा वेळी नोकरी, शिक्षण यासारखे वेगवेगळे कार्यक्षेत्र सांभाळत सामाजिक कार्यात विविध उपक्रम राबविणाऱ्या तीन मित्रांनी लव केअर शेअर फाउंडेशन संस्थेअंतर्गत एक अभियान सुरू केले. या अभियानाचे नाव ‘ब्लड डोनर्स नेटवर्क इंडिया’. या नावाने त्यांनी ग्रुप तयार केला असून, ते देशपातळीवर कार्यरत असेल. त्यामुळे देशातील कोणालाही या अ‍ॅपवरून रक्ताची मागणी नोंदवता येईल. टेलिग्राम अ‍ॅपवर त्यांनी ग्रुप तयार केला आहे. त्यातून रक्ताची सर्व माहिती समजणार आहे.

ब्लड डोनर्स नेटवर्क इंडिया अभियान म्हणजे ज्यांच्याकडे रक्त आहे आणि ज्यांना त्याची गरज आहे, या दोघांमधील दुवा.. जवळपास दीडशेपेक्षा जास्त लोकांची ही संस्था समाजात सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून चांगले काम करता येते, याचे उत्तम उदाहरण होय. व्यवस्थित काम, जबाबदारी, सुटी यांचे सुरेख नियोजन करून समाजात रक्तासाठी माणसे जोडण्याचे काम ते करीत आहेत. सहभागी सभासदांच्या राहत्या घराच्या ठिकाणानुसार माणसांची साखळी निर्माण करून कमीत कमी वेळेत अत्यावश्यक रुग्णाला रक्त कसे उपलब्ध होईल, यासाठी हे लोक दिवसरात्र प्रयत्नशील आहेत. सोशल मीडियातील फेसबुक, टेलिग्राम या दोन माध्यमांतून लोकांना एकत्र आणून, या मोहिमेचा भाग बनवून रक्ताला बांधील करतात. पीयूष शहा, करण हजारे या मित्रांची ही संकल्पना.

करण हजारे म्हणाला, ‘‘काही दिवसांपूर्वी जवळच्या एका मित्राला रक्ताच्या अनुपलब्धतेमुळे काय संकट ओढवू शकते, याचा प्रत्यय आला आणि आम्हाला समाजातील महत्त्वाची समस्या असलेल्या रक्ताची रुग्णाच्या आयुष्यातील कठीण परिस्थितीत भासणारी निकड, अडचण काय असू शकते, याची जाणीव झाली आणि त्यातून आम्ही विचारविनिमय करून ब्लड डोनर्स नेटवर्क इंडिया अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर मयूरेश बरबडे, राजकुमार पाटील, सार्थक भोकरे, आदित्य भट यांनी उपक्रमाची दिशा ठरवली.’’ त्यांना राम बांगड यांचेही या कार्यात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळते.

पीयूष शहा म्हणाला, ‘‘या उपक्रमाचा भाग होण्यासाठी हिंदी व इंग्लिश अशा दोन भाषांमध्ये असलेले आॅनलाईन पद्धतीने फॉर्म भरून द्यावे लागतात. गरज असेल त्या ठिकाणी तुम्ही रक्त देऊ शकता, कारण तुमची आमच्या संस्थेत नोंद आहे. अशा प्रकारे त्या रुग्णाला तुमची मोलाची मदत होऊ शकते. मुली व मुले अशा दोन ग्रुपमध्ये हे काम सुरू आहे. मुलांनी काम करताना संस्थेचे काही नियम ठरवले आहेत, त्यांचे पालन करणे बंधनकारक आहे. या उपक्रमात किती ठिकाणी रक्ताची गरज आहे आणि नियमित रक्तदानाची आकडेवारीयुक्त नोंद ठेवली जाईल.’’

नोंदणीनंतर देशभर रक्तदान करता येणारया उपक्रमात सहभागी होण्यासाठी टेलिग्रॅम ग्रुपवर तुम्हाला हिंदी व इंग्लिश अशा दोन भाषांत उपलब्ध असलेले आॅनलाईन फॉर्म भरावे लागतील. त्यानंतर उपक्रमात नोंदणी केली जाईल. पिनकोड, लोकेशन, नाव, ब्लड ग्रुप या माहितीचा त्यात समावेश असेल. तुमची रजिस्टर नोंदणी झाल्यानंतर देशातील कोणालाही रक्तदान व रक्तासाठी गरज म्हणून येथे नोंद करता येईल.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी