घरफोडय़ांची टोळी पकडली
By Admin | Updated: November 27, 2014 00:01 IST2014-11-27T00:01:49+5:302014-11-27T00:01:49+5:30
गेल्या आठ महिन्यांपासून चतु:श्रृंगी हद्दीत घरफोडय़ांचे प्रमाण वाढले होते. झोन तीनच्या तपास पथकाने अखेर टोळीला सापळा रचून जेरबंद केले. 3 लाख 16 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

घरफोडय़ांची टोळी पकडली
वाकड : गेल्या आठ महिन्यांपासून चतु:श्रृंगी हद्दीत घरफोडय़ांचे प्रमाण वाढले होते. झोन तीनच्या तपास पथकाने अखेर टोळीला सापळा रचून जेरबंद केले. 3 लाख 16 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
अभिषेक लालासाहेब कोरडे (वय 18, रा. बालेवाडी स्टेडीयम जवळ, म्हाळुंगे), चंद्रकांत अशोक घोडके (18, रा. सरिता रेसिडेंन्सी, भेकराईनगर, हडपसर), विनोद वामन रनशिंगे (18, रा. राजयोग सोसायटी, बाणोर-म्हाळुंगे रोड, पुणो), राजू बाळासाहेब सपकाळ (18, रा. संतोष तापकीर चाळ, बाणोर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी, चतु:श्रुंगी हद्दीतील घरफोडय़ा करणा:या टोळीचा म्होरक्या अभिषेक आणि त्याचे अन्य तीन साथीदार हे बाणोर येथील डी-मार्ट येथे येणार असल्याची माहिती झोन तीन तपास पथकातील सहाय्यक निरीक्षक महेश सागडे यांना बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 5 गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे 11 तोळ्याचे दागिने,तीन लॅपटॉप, एक आयफोन, आयपॉड, चार एलसीडी मॉनीटर, सहा डिजिटल कॅमेरे, तीन मनगटी घडय़ाळे, दोन मोबाईल असा ऐवज ताब्यात घेतला आहे. सहाय्यक निरीक्षक महेश सागडे, प्रमोद क्षिरसागर, पोलिस हवालदार दत्तात्रय फुलसुंदर, नितीन ढोरजे, महादेव जावळे, किशोर पाटील, महादेव धनगर, नागनाथ लकडे, रवींद्र तिटकारे यांनी कारवाईत सहभाग घेतला. (वार्ताहर)