शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सकल जैन समाजाचा चातुर्मास जाहीर, जैन बांधवात आनंदोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 01:54 IST

आचार्य शिवमुनीजी म.सा. : जैन बांधवात आनंदोत्सव

पुणे : स्थानकवासी जैन समाजाचे आचार्य डॉ. शिवमुनीजी म. सा. युवाचार्य प. पू. महेंद्रऋषीजी म. सा. आदी ठाणा १२ यांचा २०१९चा चातुर्मास पुणे सकल जैन समाजाला जाहीर झाला. आचार्यजींनी केलेल्या या घोषणेमुळे पुण्यातील जैन समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील अनेक वर्षांपासुन आचार्य प. पू. शिवमुनीजी म. सा. यांचा चातुर्मास पुण्यात व्हावा, यासाठी सर्व जैनबांधव प्रयत्न करीत होते. अनेक वेळा विविध संघांचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी आचार्यजींना विनंती करण्यासाठी गेले होते. त्यांच्या विनंतीला मान देत आचार्य यांनी १२ तारखेला ज्ञान पंचमीचा मुहूर्त साधत चातुमार्साची घोषणा केली. आचार्य शिवमुनीजीचा चातुर्मास पुणे शहराला मिळणे म्हणजे, समस्त पुणेकरांसाठी अभिमानाची व भाग्याची गोष्ट आहे. लाखो भाविक दर वर्षी आचार्यश्रींचे न चुकता दर्शन घेतात. त्यामुळे पुढच्या वर्षी पुण्यातील जैन समाजाला चार महिने खूप मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

पुणे सकल जैन समाजाची एक कमिटी ही चातुर्मास पूर्ण पाडणार आहे. दक्षिण पुण्यात म्हणजेच स्वारगेट ते कात्रज या भागात, तसेच पुणे शहराच्या अनेक भागात पुढच्या वर्षी चातुर्मास होणार नाही. हे सर्व संघ मिळून हा चातुर्मास करणार आहेत.या चातुर्मास आयोजन कमिटीमध्ये विजयकांत कोठारी, पोपटलाल ओसवाल, विलास राठोड, बाळासाहेब धोका, मदनलाल बलदोटा, जुगराज पालरेशा, प्रकाश धारिवाल, राजेश सांकला, विजय भंडारी, आदेश खिंवसरा, अविनाश कोठारी यांच्यासह विविध संघाचे व संस्थेचे पदाधिकारी सम्मिलीत झाले आहेत. पुणे सकल जैन समाज हा चातुर्मास यशस्वी करण्यासाठी कामाला लागला आहे. 

टॅग्स :PuneपुणेJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र