शिक्रापूर पोलीस ठाण्यात आज तक्रार निवारण दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:16 IST2021-09-09T04:16:32+5:302021-09-09T04:16:32+5:30

नागरिकांनी यापूर्वी पोलीस महासंचालक कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिक्रापूर पोलीस स्टेशन ...

Grievance Redressal Day at Shikrapur Police Station today | शिक्रापूर पोलीस ठाण्यात आज तक्रार निवारण दिन

शिक्रापूर पोलीस ठाण्यात आज तक्रार निवारण दिन

नागरिकांनी यापूर्वी पोलीस महासंचालक कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिक्रापूर पोलीस स्टेशन तसेच आपले सरकार किंवा इतर वरिष्ठ कार्यालयांकडे केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार शिक्रापूर येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या वेळी तक्रार निवारण दिनामध्ये नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता अर्जदार तसेच गैरअर्जदर यांना समक्ष बोलावून तक्रारींवर निर्णय घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. तक्रार निवारण दिनासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी व अंमलदार उपस्थित राहणार असून, काही वरिष्ठ अधिकारी देखील या तक्रार निवारण दिनास भेट देत उपस्थित राहणार आहे. तरी तक्रारदारांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या तक्रारींचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.

Web Title: Grievance Redressal Day at Shikrapur Police Station today