जेजुरी गडावर आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST2021-02-05T05:03:52+5:302021-02-05T05:03:52+5:30
सकाळी आद्यक्रांतिवीर उमाजीराजे नाईक यूथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ...

जेजुरी गडावर आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक अभिवादन
सकाळी आद्यक्रांतिवीर उमाजीराजे नाईक यूथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवने,जेजुरी देवसंस्थांनचे प्रमुख विश्वस्त सॉलिसिटर प्रसाद शिंदे,विश्वस्त संदीप जगताप, शिवराज झगडे,पंकज निकुडे,अशोकराव संकपाळ,राजकुमार लोढा मुख्य कार्यकारी आधिकारी राजेंद्र जगताप,व्यवस्थापक सतीश घाडगे,जेजुरी पालिकेचे विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, जेजुरी भाजपा अध्यक्ष सचिन पेशवे आदी उपस्थित होते .
उमाजी नाईक यांच्या पुतळ्या सभोवताली देवसंस्थांच्या वतीने सुशोभीकरण करण्यात आले. तसेच पुतळ्या समोरील वेशीला उमाजी नाईक यांचे नाव देणार असल्याचे देवसंस्थांनच्या वतीने सांगण्यात आले.यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र खोमणे,पदाधिकारी पोपट खोमणे,माऊली खोमणे,सुंदर खोमणे,यशवंत भांडवळकर,शिवाजी चव्हाण, संजीवन बोडरे आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले .
११ वाजता आद्यक्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक समाजसुधारक मंडळ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने गडावर उमाजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. आमदार विद्या चव्हाण, प्रा. दिगंबर दुर्गाडे , संघटनेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण व कार्यकर्त्यांनी पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली . नरवीर उमाजी नाईक यांना बलिदानपर भारतरत्न पुरस्कार द्यावा, पुरंदरमधील नियोजित विमानतळाला उमाजी नाईक यांचे नाव द्यावे, पाठ्यपुस्तकात उमाजी नाईक यांच्या इतिहासाचा समावेश करावा,शासनाने उमाजी नाईक यांच्या जीवनावर चित्रपट निर्माण करावा अशा मागण्या या वेळी संघटनेच्या वतीने आमदार विद्या चव्हाण यांच्याकडे करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे नियोजन संघटनेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण,हर्षवर्धन चव्हाण,अशोक खोमणे,राजकुमार गडकरी,राजेंद्र माकर, राजेंद्र चव्हाण,विश्वनाथ मचकूले,देवराम गुळवे आदींनी केले .