क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST2021-01-08T04:31:12+5:302021-01-08T04:31:12+5:30
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ज्योती सावित्री जयंती उत्सव समिती, महात्मा फुले समता परिषद, श्रीसंत शिरोमणी सावता महाराज समाजसेवा ...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ज्योती सावित्री जयंती उत्सव समिती, महात्मा फुले समता परिषद, श्रीसंत शिरोमणी सावता महाराज समाजसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले .
येथील शिवसेवा मंदिराजवळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. खानापुरे यानी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती दिली.
नगरसेविका रोहिणी बनकर, प्रा. डॉ. ईश्वर पवार, बापू सानप यांची ही भाषणे या वेळी झाल .
या वेळी रवींद्र धनक, नगरसेविका मनीषा कालेवार, दादा भुजबळ, मास्टर भुजबळ, ॲड. प्रदीप बारवकर, शशिकला काळे, शोभना पाचंगे, नंदु कुरे, डॉ. विक्रम घावटे, ॲड. रवी खांडरे, महिबूब सय्यद, बाळासाहेब गायकवाड, संतोष मोरे, बाळासाहेब ओस्तवाल, दिनकर पाडळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी, तर आभार राजेंद्र खेतमाळीस यानी मानले.
रयत विद्यार्थी विचार मंच शिरूर तालुका यांच्या वतीने ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
या वेळी बोलताना मंचे तालुकाध्यक्ष समीर काझी म्हणाले की, क्रांतिज्योती सवित्रीबाई फुले या शिक्षिका,
व समाजसुधारक होत्या. स्त्रीशिक्षणात महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे मोठे योगदान आहे.
या वेळी पल्लवी इसवे, आबिद बागवान, माया माने, ज्योती इसवे आदी उपस्थित होते.