किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:47+5:302021-05-15T04:10:47+5:30
गराडे : पुरंदर पंचायत समिती, पुरंदर प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, नारायणपूर ग्रामस्थ व विविध संस्था यांच्या वतीने ...

किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
गराडे : पुरंदर पंचायत समिती, पुरंदर प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, नारायणपूर ग्रामस्थ व विविध संस्था यांच्या वतीने वतीने दरवर्षी १४ मे रोजी किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळी जन्मोत्सवाचा कार्यक्रम साजरा केला जातो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी पेठ नारायण येथे शंभूजन्मोत्सव कार्यक्रम साधेपणाने मोजक्या लोकांच्या उपस्थिती साजरा करण्यात आला.
१४ मे ला दरवर्षी देशाच्या विविध भागातून, राज्य भरातून ४० ते ५० हजार शंभूभक्त गडावर येतात. प्रशासन व विविध संस्थाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. किल्ले पुरंदरच्या आसंमतात पाळणा, पोवाडे, शौर्यगीते घुमतात. भगवे ध्वज हाती घेतलेली तरुणाई अभिमानाने किल्ल्यावर संचार करते. शंभूराजांच्या जन्मस्थळी त्यांच्या पराक्रमास मुजरा करुन नतमस्तक होते. परंतु कोरोनामुळे गेल्यावर्षीपासून शंभूजन्मोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी आमदार संजय जगताप, पुरंदर पं.स.सभापती नलिनी लोळे, जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी सदस्य, प्रशासकीय अधिकारी यांनी अभिवादन केले. संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन १३ मे रोजी रात्री नारायणपूर देवस्थानचे सदगुरु नारायण महाराज यांच्या हस्ते दत्त मंदिरात करण्यात आले. त्यानंतर पुतळा किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी पेठ नारायण येथे अभिवादनासाठी ठेवण्यात आला.
किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटणे, रमेश बापु कोंडे, राजेंद्र पासलकर, राजेंद्र बांदल, प्रकाश शिंदे,अमित गाडे, संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष लोकेश सावंत,पुरंदर तालुका अध्यक्ष सागर जगताप, संतोष हगवणे, आनंद जंगम, नारायणपूर ग्रामस्थांच्या वतीने भरतनाना क्षिरसागर, रामभाऊ बोरकर, चंद्रकांत बोरकर, पोपट महाराज बोरकर, प्रमोद डांगे, ज्ञानोबा डांगे, प्रदिप जगताप, प्रदिप बोरकर, योगेश जगदाळे, योगेश देशमुख, निलेश डांगे, आनंद बोरकर, बाळा बोरकर, सोनू बोरकर, भाऊसाहेब बोरकर व नारायणपूर, पेठ नारायण ग्रामस्थ यांनी अभिवादन केले.
कोट
याही वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे पालन करुन जयंती सोहळा साजरा करण्यासाठी गडावरील प्रशासनाकडे ५ मे रोजी कमीत कमी उपस्थितीमध्ये परवानगी मागितली होती. परंतु गडावर ०९ कोरोनाबाधित आढळून आल्याने तेथील प्रशासनाकडून ११ मे रोजी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासकीय पूजेसाठी वा इतर कोणत्याही संस्थेस परवानगी नाकारली. त्यामुळे यावर्षी किल्ले पुरंदर येथे सालाबादप्रमाणे संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वा कोणताही कार्यक्रम साजरा करता आला नाही.
- मोहन गायकवाड, गटशिक्षणाधिकारी
फोटोओळी - पेठ नारायण ( ता.पुरंदर ) येथे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादनप्रसंगी प्रशांत पाटणे, रमेश कोंडे व इतर मान्यवर