बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2015 00:12 IST2015-12-07T00:12:59+5:302015-12-07T00:12:59+5:30

‘जगाला समतेचा मार्ग दाखविणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भक्त न होता अनुयायी व्हा,’ असे आवाहन मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे

Greetings to Babasaheb Ambedkar | बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

इंदापुरात अभिवादन
इंदापूर : ‘जगाला समतेचा मार्ग दाखविणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भक्त न होता अनुयायी व्हा,’ असे आवाहन मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी येथे केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. बुद्धवंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. रत्नाकर मखरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाबाबत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी मुख्याध्यापक साहेबराव पवार, सुनील मिसाळ, सविता गोफणे यांनी मनोगत व्यक्त केले.
आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
नारायणगाव : विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जुन्नर तालुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने आज जुन्नर येथे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या वेळी गणेश वाव्हळ, राजेंद्र रणदिवे, सचिव विलास कडलाक, पंकज खरात, रवींद्र मोरे, बाळासाहेब दहिफळे आदी उपस्थित होते. डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुक्यातील विविध संघटना व संस्थांच्या तसेच बौद्ध समाजबांधवांच्या वतीने या महामानवाला अभिवादन करण्यात आले. डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने आज सकाळी जुन्नर येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सामूहिक बुद्धवंदना, त्रिशरण व पंचशील घेण्यात आले तसेच पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
सासवड : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त सासवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुरंदर तालुका बौद्धजन विकास संघटनेच्या वतीने पुतळ्यास सी. एम. यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी आनंदराव घोरपडे, रमाकांत कांबळे, प्रा. गौतम बेंगळे, पल्लवी भोसले, सुहास बेंगळे, राजाराम बेंगळे, रामचंद्र कांबळे, सीताराम जगताप, पांडुरंग पाटील, प्रा. केशव काकडे, नंदकुमार दिवसे, वामन गायकवाड, महापरिवर्तन ट्रस्टचे प्रकाश धिवार, शकुंतला सोनावणे यांच्यासह बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सासवड नगर परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी नगरसेवक अजित जगताप, यशवंत भांडवलकर, नगरसेविका मीना वढणे, सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
शिरूर येथे
बाबासाहेबांना अभिवादनशिरूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे सर्वांना जगण्याचा समान अधिकार मिळाला. त्यांच्यामुळे मी नगराध्यक्षा होऊ शकले, असे गौरवोद्गार नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी काढले. नगर परिषदेच्या वतीने डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. गावडेंसह नगरसेवक व शिक्षण मंडळ सदस्य या वेळी उपस्थित होते. विविध संस्था- संघटनांच्या वतीनेही अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्षा गावडे यांच्यासह माजी उज्ज्वला बरमेचा, रवींद्र ढोबळे, अशोक पवार, आबिद शेख, सुवर्णा लोळगे, प्रा. प्रभुलिंग वळसंगे, नीलेश खाबिया, राजेंद्र जाधवराव, संतोष शितोळे, सदस्य तुकाराम खोले, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, अभियंता कुंभार यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केले. फुले, आंबेडकर संयुक्त जयंती समितीच्या वतीने पुतळ्याजवळ अभिवादन सभा घेण्यात आली.
४ नगराध्यक्षा गावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सभेला हजेरी लावली. माया गायकवाड, रमेश गायकवाड, बबन गायकवाड, मुकुंद नगराळे, समितीचे माजी अध्यक्ष प्रमोद गायकवाड, बाफसेफचे डॉ. मगन ससाणे, बीएसपीचे अनिल गायकवाड, शहर राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष नीलेश पवार, संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष विनोद भालेराव, पांडुरंग बनसोडे, अनिल बांडे, शरद गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी या वेळी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.