अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:09 IST2021-06-04T04:09:32+5:302021-06-04T04:09:32+5:30

हनुमंत बंडगर म्हणाले, अहिल्यादेवी जयंती उत्सव समितीने भिगवण गट कोरोनामुक्त करण्याचा केलेला संकल्प कौतुकास्पद आहे. त्यांचा हा संकल्प अहिल्यादेवींच्या ...

Greetings to Ahilya Devi Holkar | अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

हनुमंत बंडगर म्हणाले, अहिल्यादेवी जयंती उत्सव समितीने भिगवण गट कोरोनामुक्त करण्याचा केलेला संकल्प कौतुकास्पद आहे. त्यांचा हा संकल्प अहिल्यादेवींच्या विचारांना मानवंदना देणारा आहे. तर मदनवाडी अहिल्यादेवी जयंती उत्सव समिती रक्तदान शिबिरे, अन्नदान, गोरगरिबांना वैयक्तिक मदत, जनजागृती कार्यक्रम असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याने अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा ही समिती जपत आहे उत्सव समितीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने जयंती साजरी करून सर्वांनाच चांगला संदेश दिला असल्याचे मनोगत सहायक पोलीस निरिक्षक जीवन माने यांनी केले.

कार्यक्रमाचे संयोजन दादासाहेब थोरात, आबासाहेब बंडगर, महेश शेंडगे, वैभव देवकाते, संदीप वाकसे, कुंडलिक बंडगर, नामदेव बंडगर आदींनी केले होते तर निमंत्रक अनिल तांबे होते.

०३ भिगवण

अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर.

Web Title: Greetings to Ahilya Devi Holkar