हिरवेत बिबट्या जेरबंद
By Admin | Updated: January 8, 2015 22:59 IST2015-01-08T22:59:12+5:302015-01-08T22:59:12+5:30
हिवरे बु. (ता. जुन्नर) येथे तब्बल १२ दिवस पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची प्रतीक्षा १३ व्या दिवशी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने संपली.

हिरवेत बिबट्या जेरबंद
ओझर : हिवरे बु. (ता. जुन्नर) येथे तब्बल १२ दिवस पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची प्रतीक्षा १३ व्या दिवशी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने संपली.
हिवरे बु., ओझर, शिरोली बु., खुर्द, घालेवाडी, भोरवाडी या परिसरात बिबट्याची मोठी दहशत होती. भारनियमनामुळे रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देताना शेतकरी अक्षरश: जीव मुठीत धरून रात्र काढत होते. बिबट्याने या परिसरातील बहुतांश कुत्र्यांचा फडशा पाडला होता. दोन बिबटे व दोन बछडे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितल्याने येथे पिंजरा लावला होता. सुरूवातील पिंजरा शेतकरी तान्हाजी बेनके यांच्या शेतात लावला. त्यात कुत्री ठेवली होती. मात्र कुत्री पिंजऱ्यातून सटकली. त्यानंतर तेथून पिंजरा हलवून तो नंदाराम भोर यांच्या शेतालगत लावला. त्यामध्ये मेंढरू ठेवले. बुधवारी रात्री बिबट्या ते मेंढरू खाण्यासाठी तेथे आला आणि पिंजऱ्यात अडकला. त्याला पकडल्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. दरम्यान वविभागाबाबत नागरीकांनी अनेक तक्रारी केल्या.