‘भामा आसखेड’ला हिरवा कंदील

By Admin | Updated: December 13, 2014 00:31 IST2014-12-13T00:31:42+5:302014-12-13T00:31:42+5:30

भामा आसखेड धरणातून पुणो शहराला पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणा:या जलवाहिनीला वनविभागाने हिरवा कंदील दाखविला.

Green lanterns for 'Bima Askhed' | ‘भामा आसखेड’ला हिरवा कंदील

‘भामा आसखेड’ला हिरवा कंदील

पुणो : भामा आसखेड धरणातून पुणो शहराला पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणा:या जलवाहिनीला वनविभागाने हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित जागेसाठी योग्य मोबदला देऊन काम सुरू करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. 
राज्य शासनाने भामा आसखेड धरणातून 2.8क् टीएमसी पाणी पुणो शहराला देण्यास मंजुरी दिली. त्यानुसार महापालिकेने भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी 
तब्बल 38क् कोटींचा आराखडा तयार केला आहे. तब्बल 42 किलोमीटर अंतरावरून हे पाणी पुण्यात 
आणले जाणार आहे. गेल्या 
वर्षापासून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, खेड तालुक्यातील मेदनकरवाडी व चिंबळी या गावातील वनविभागाच्या जागेतून जलवाहिनी टाकण्याची परवानगी मिळण्याची मागणी प्रशासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. 
पुणो शहरातील विविध विकासकामांसाठी आठ दिवसांत ‘ना हरकत’ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन आठवडय़ांपूर्वी झालेल्या बैठकीत दिले होते. त्यानुसार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वनविभागाने काही अटीवर महापालिकेला सुमारे 1 हेक्टर 
क्षेत्रतून जलवाहिनी टाकण्यास 
हरकत नसल्याचा अभिप्राय दिला आहे. 
दरम्यान, नागपूर अधिवेशन सुरू असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी करून, या प्रकल्पाचे काम सुरू करण्यास तत्त्वता मान्यता दिल्याचे पत्र महापालिकेला आज मिळाले.  (प्रतिनिधी)
 
‘आराखडय़ा’विषयी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक..
4 शहराचा विकास आराखडा घाईत मंजूर न करता मुदतवाढ मिळावी, आणि आराखडय़ातील बदलांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक 
घ्यावी, अशी मागणी आमदार मेधा कुलकर्र्णी यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर ‘आराखडय़ा’विषयी बैठक घेण्याचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्नी डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत गुरुवारी दिले. 

 

Web Title: Green lanterns for 'Bima Askhed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.