शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

तुम्हीच 'फ्रंटलाईन वर्कर्स'; पुण्यातील सोसायट्यांनी उचलली 'आपल्या माणसां'च्या लसीकरणाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 20:30 IST

कोरोना काळात ही माणसं स्वतःसोबत ल त्यांच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून आपल्यासाठी काम करतात..त्यांच्यासाठी इतकं तर आपण नक्कीच करू शकतो....

दीपक कुलकर्णी- 

पुणे : पुणे, मुंबईसह राज्यात कोरोना दिवसेंदिवस भयावह रूप धारण करतो आहे. त्याला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन यंत्रणा आपापल्यापरीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.यात लसीकरणाची मोहीम सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याचवेळी हिंजवडी, माण परिसरात एक स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. रहिवाशांनी परिसरातील शासनाकडून दुर्लक्षित अशा ४५ वर्षांपुढील 'फ्रंटलाईन वर्कर्स'च्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.

पुणे,पिंपरी चिंचवड परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. आणि यावेळी मोठमोठ्या सोसायट्या, इमारती कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याचे समोर येत आहे.परंतू, याही विदारक  परिस्थितीत सोसायट्यांचे सुरक्षारक्षक, सफाई कामगार, कचरा गोळा करणारे, घरातील कामवाल्या महिला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत  आहे.त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे कर्तव्य समजून  हिंजवडी, माण परिसरातील काही सोसायट्यांनी ४५ वर्ष पूर्ण केलेल्या फ्रंटलाईन वर्कर्स च्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. 

याबाबत रहिवासी रवींद्र सिन्हा म्हणाले, मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये सुरक्षारक्षक,सफाई कामगार,कचरा वेचक यासारखी अनेक मंडळी कोरोनाकाळात देखील आपले काम करत आहे. त्यांच्यात ४५ वर्षांपुढील अनेक जण आहेत. त्यांना कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे जमत नाही. तसेच त्यांच्या ड्युटीच्या वेळेमुळे तिथे जाणे कठीण होते. यासाठी काही सोसायट्यांनी पुढाकार घेतला असून लसीकरणाच्या प्रक्रियेतील नोंदणीपासून ते तिथे घेऊन जात लसीकरण पूर्ण करत आहोत. आतापर्यंत जवळपास १००हुन अधिक अशा वर्कर्सचे लसीकरण करण्यात आले आहे. अधिकाधिक सोसायट्यांनी आपल्या भल्यासाठी काम करणाऱ्या या फ्रंटलाईन वर्कर्स साठी असा उपक्रम राबविणे गरजेचे आहे.

या उपक्रमाचा भाग असलेली मेगापोलिश सोसायटीचे अंशुल गुप्ता म्हणाले,मोठंमोठ्या टाऊनशीप मध्ये साधारण २० ते ५० फ्रंटलाईन कर्मचारी काम करत असतात.त्यांच्या आरोग्याला धोक्यात घालून ते आपल्या कुटुंबाची काळजी घेत असतात. याचीच जाणीव ठेवून आम्ही आमच्या सोसायटीमधील ४५वर्षांच्या पुढील कामगारांचे लसीकरण पूर्ण करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यात आमचे मॅनेजरसह इतर शक्य असलेले सभासद या लोकांना घेऊन लसीकरण केंद्रावर जातात. तिथे सर्व प्रक्रिया पूर्ण  करून लसीकरण पूर्ण केले जाते.

....या फ्रंटलाईन वर्कर्सच्या लसीकरणासाठी वयोमर्यादेची अट शिथिल करावी...

केंद्र व राज्य सरकारने आता सफाई कामगार, सुरक्षारक्षक, कचरा वेचणारे, कामवाल्या महिला यांना फ्रंटलाईन वर्कर्सच्या पंक्तीत आणून त्यांच्या लसीकरणाला परवानगी द्यावी. ही परवानगी मिळाली तर लसीकरण मोहीम अधिक व्यापक होईल.आणि या माणसांची कुटुंब सुरक्षित होण्यास मोठा हातभार लागेल.रवींद्र सिन्हा, रहिवासी.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड