गेम चेंजर संघाचा शानदार विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:12 IST2021-03-27T04:12:25+5:302021-03-27T04:12:25+5:30

पुणे : सनी इलेव्हन चषक क्रिकेट स्पर्धेत गेम चेंजर संघाने शुक्रवारी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला. पहिल्या सामन्यात गेम चेंजर ...

Great game changer team | गेम चेंजर संघाचा शानदार विजय

गेम चेंजर संघाचा शानदार विजय

पुणे : सनी इलेव्हन चषक क्रिकेट स्पर्धेत गेम चेंजर संघाने शुक्रवारी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला.

पहिल्या सामन्यात गेम चेंजर संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत पाच बाद २३७ धावा केल्या. फ्रेंड्स क्लबचा डाव ५७ धावांतच संपुष्टात आल्याने गेम चेंजरने १८० धावांनी विजय मिळवला. गेम चेंजरकडून दिव्यांग हिंगणेकरने २९ चेंडूंत आठ षटकार आणि पाच चौकारांसह ८३ धावा केल्या. शेख दामले याने २४ चेंडूंत ५८ धावा करत संघाला २३७ पर्यंत मजल मारून दिली. २३७ धावांचा पाठलाग करताना गेम चेंजरच्या हितेश वाळुंज (३-१२), रोहन दामले (३-१४), नौशाद शेख (२-४) यांच्या गोलंदाजीपुढे फ्रेंड्स क्लबचा डाव ५७ धावांवर संपुष्टात आला. फ्रेंड्सकडून अथवर्व तांदळे याने १४ धावा करत एकाकी झुंज दिली.

दुसऱ्या सामन्यात गेम चेंजर संघाने सहारा क्रिकेट अकादमीचा सात गडी राखून पराभव केला. सहारा संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सात बाद १६६ धावा केल्या. गेम चेंजर संघाने १७ षटकांत तीन बाद १६७ धावा करताना विजय साकारला. सहाराकडून मानसिंग निगेडे (४४), राहुल देसाई (६०) यांनी संघाला १६६ पर्यंत नेले. गेम चेंजरने युवराज झगडे (४७), दिव्यांग हिंगणेकर (३८) यांच्या फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला.

Web Title: Great game changer team