शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कौतुकास्पद ! "या " गावाने घेतला माजी सैनिकांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 13:46 IST

ग्रामसभेत पुरुषांबरोबरच महिलांनीही या ठरावाचे केले स्वागत

ठळक मुद्देसर्वानुमते ठराव मंजूर पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये माजी सैनिकांना घरपट्टी माफ व्हावी म्हणून पाठपुरावा करणारमाजी सैनिकांच्या कुटुंबीयांना घरपट्टी पासून कायमची सवलत मिळणार

संदीप वाडेकर पुणे :  देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुटुंबापासून दूर राहून शत्रूशी अहोरात्र लढणाऱ्या जवानांचा सन्मान करण्यासाठी बहुळ ग्रामपंचायतीने माजी सैनिकांची घरपट्टी माफ केली आहे.  देशासाठी केलेला त्याग लक्षात घेऊन त्यांना कायम मानाचे स्थान देण्याचा निर्णय घेवून बहुळ ग्रामपंचायतीने एक आदर्श निर्माण केला आहे.   बहुळ ( तालुका खेड)  येथे  सरपंच  गणेश वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ग्रामसभा पार पडली. यामध्ये माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्याचा ठराव मांडला.  यावेळी सवार्नुमते त्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी  उपसरपंच दीपाली आरेकर,  ग्रामसेवक मतकर,  संदीप साबळे,  प्रवीण साबळे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत वाडेकर  तसेच शक्ती साबळे, आदीक साबळे, हनुमंत सुतार,  महादेव वाडेकर,  अरूण पानसरे  आदी माजी सैनिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.   राज्य सरकारने माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील बहुतेक जिल्हा परिषदेने  आपापल्या जिल्ह्यात तसेच महापालिकेने माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णय या अगोदर घेतलेला आहे.  पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी सुरज मांढरे पदभार सांभाळत असताना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना तसे ठराव मंजूर करून घेण्याबाबत कळवले होते. याच पार्श्वभूमीवर बहुळगावचे सुपुत्र माजी सैनिक  शक्ती साबळे यांनी याबाबत पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीने योग्य तो ठराव मंजूर करून घ्यावा अशी विनंती केली होती. ठराव मंजूर झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी पंचायत समिती खेड यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.  त्यामुळे आता पुढील काळात या सर्व माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना घरपट्टी पासून कायमची सवलत मिळणार आहे.ग्रामसभेत पुरुषांबरोबरच महिलांनीही या ठरावाचे स्वागत केले.  

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये माजी सैनिकांना घरपट्टी माफ व्हावी म्हणून पाठपुरावा करणार असून सर्व सैनिकांपर्यंत हा निर्णय पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे  

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानgram panchayatग्राम पंचायतState Governmentराज्य सरकार