द्राक्षे फुकट न दिल्याने मारहाण
By Admin | Updated: January 24, 2017 02:45 IST2017-01-24T02:45:15+5:302017-01-24T02:45:15+5:30
फुकट द्राक्षे दिली नाहीत, म्हणून फळविक्रेत्याला फरशीच्या तुकड्याने मारून जखमी करणाऱ्या तिघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली.

द्राक्षे फुकट न दिल्याने मारहाण
पुणे : फुकट द्राक्षे दिली नाहीत, म्हणून फळविक्रेत्याला फरशीच्या तुकड्याने मारून जखमी करणाऱ्या तिघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेण्यात आले आहे.
प्रतीक अशोक जाधव आणि रूपेश प्रदीप साळुंखे (दोघेही वय १९, रा. वडगाव शेरी) आणि मझर सलीम शेख (वय १९, रा़ चंदननगर) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी धर्मेंद्र भगवान मदेसिया (वय २६, रा. वडगावशेरी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (दि. २२) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. तपासासाठी न्यायालयाने त्यांची २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़