द्राक्षे निघाली आखाती देशांत

By Admin | Updated: January 10, 2015 23:00 IST2015-01-10T23:00:23+5:302015-01-10T23:00:23+5:30

जुन्नर तालुक्यातून आखाती देशामध्ये काळ्या जातीच्या द्राक्षांच्या निर्यातीस सुरुवात झाली आहे.

Grapes are out in the Gulf countries | द्राक्षे निघाली आखाती देशांत

द्राक्षे निघाली आखाती देशांत

आळेफाटा : जुन्नर तालुक्यातून आखाती देशामध्ये काळ्या जातीच्या द्राक्षांच्या निर्यातीस सुरुवात झाली आहे. ढगाळलेले वातावरण व अवकाळी पाऊस याबाबत शेतकरी वर्गाने द्राक्ष बागांची प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने यावर्षी निर्यातीमध्ये वाढ होणार आहे.
जुन्नर तालुक्यात पाणी उपलब्धतेमुळे द्राक्ष पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. द्राक्ष उत्पादनात तालुका जिल्ह्यात अग्रेसर आहे. आठशे पन्नास हेक्टर क्षेत्रावर तालुक्यात या द्राक्षबागा आहेत. येथील उत्पादित होणारी शरद सिडलेस व जम्बो ही काळ्या जातीची द्राक्ष आखाती देशांमध्ये तर गणेश सोनाटा व इतर सफेद द्राक्ष य़ुरोपियन देशांमध्ये निर्यात होतात, तसेच देशातंर्गत बाजारपेठेतही येथील द्राक्षांची चांगली विक्री होते. दरम्यान या वर्षी कृषी विभागाकडे चारशे पंचविस शेतकरी वर्गाने द्राक्षे निर्यातीसाठी सदाशे तेरा बागांची नोंदणी केली आहे, याबाबत माहिती देताना तालुका कृषी आधिकारी बी.बी.वाणी व शेतीतज्ञ बापु रोकडे यांनी सांगीतले की शरद सिडलेस व जम्बो ही काळ्या जातीची द्राक्ष परीपक्व होऊन तोडणीस सुरुवात झाली आहे. तालुक्यातील गोळे गाव येथील काळ्या जातीची द्राक्षे ही अरब देशात निर्यात होऊ लागली आहेत. गुंजाळवाडी येडगाव, नारायणगाव, पिंपळवंडी येथील द्राक्षेही आता निर्यातीस सज्ज झाली आहेत.


श्रीलंकेतही निर्यात
यावर्षी तालुक्यातील काळ्या जातीच्या द्राक्षांची प्रथमताच शेजारील श्रीलंका देशात २० टन काळ्या जातीच्या द्राक्षांची निर्यात झाली आहे.

४ यावर्षीचे ढगाळलेले वातावरण अवकाळी पाऊस याबाबत शेतकरी वर्गाने द्राक्ष बागांची वेळोवेळी योग्य अशी काळजी घेतल्याने चांगल्या प्रतीच्या द्राक्षांचे उत्पादन तालुक्यात होणार असल्याने निर्यातीमध्येही वाढ होऊन एक चांगले परकीय चलन शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

४ सध्या निर्यात होणाऱ्या काळ्या जातीच्या द्राक्षां नाही चांगला असा बाजारभाव मिळत आहे. तर काळ्या जातीची द्राक्षे जवळपास तीनशे मेट्रीक टनाच्यावर होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. तालुक्यात उत्पादीत होणारी सफेद द्राक्षांच्या निर्यातीसही युरोपीयन देशांमध्ये पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे.

४शरद सिडलेस व जम्बो ही काळ्या जातीची द्राक्ष परीपक्व होऊन तोडणीस सुरुवात झाली आहे. तालुक्यातील गोळे गाव येथील काळ्या जातीची द्राक्षे ही अरब देशात निर्यात होऊ लागली आहेत. अरब देशामधील सौदी अरेबिया, इराण, कझाकीस्तान, दुबई येथे ही द्राक्षे जाणार आहेत.

Web Title: Grapes are out in the Gulf countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.