शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लोन अ‍ॅपवरुन होणारी बदनामी टाळण्यासाठी नातीने केला आजीचा खून

By विवेक भुसे | Updated: September 14, 2022 10:15 IST

ज्येष्ठ महिलेचा खूनाच्या गुन्ह्याचा वारजे पोलिसांना छडा लावण्यात यश...

पुणे : लोन अ‍ॅपवरुन कर्ज घेतल्यानंतर सायबर चोरट्यांकडून बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांना लुबाडले जाते. पुण्यासह अनेक शहरात या सायबर चोरट्यांनी धुमाकुळ घातला असतानाच आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लोन अ‍ॅपवरुन होणारी बदनामी टाळण्यासाठी नातीने चक्क आपल्या आजीचा खून करुन चोरीच बनाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. वारजेतील आकाशनगर भागात एका ज्येष्ठ महिलेचा खूनाच्या गुन्ह्याचा वारजे पोलिसांना छडा लावण्यात यश आले आहे.

गौरी सुनिल डांगे (वय २४, रा. आकाशनगर, वारजे) असे खून केलेल्या नातीचे नाव आहे. सुलोचना सुभाष डांगे (वय ७०) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. पोलिसांनी गौरी सुनिल डांगे हिचीच सुरुवातीला फिर्याद घेतली होती. मात्र, पोलीस तपासात तिनेच हे कृत्य केल्याचे रात्री उशिरा निष्पन्न झाले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील आकाशनगर परिसरात डांगे, त्यांचा मुलगा आणि नात रहायला आहे. त्यांचा मुलगा सुनिल सुतारकाम करतो. सुलोचना डांगे या मंगळवारी घरी एकट्या होत्या. त्यांची मुलगी गौरी ही खासगी बँकेत नोकरी करते. ते दोघेही कामाला गेले होते. पाण्याची मोटार सुरु होत नसल्याने त्यांचा भाडेकरु सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी गेला. तेव्हा त्यांचे दार उघडेच होते. त्यांनी आत जाऊन पाहिले तर सुलोचना या खाली पडल्या होत्या. घरातील कपाट उघडे होते. त्यातील वस्तू अस्तावेस्त पडलेल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके व अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी सुनिल डांगे व गौरी डांगे यांच्याकडे चौकशी सुरु केली. तेव्हा त्यांच्या माहितीत तफावत दिसून येत होती. त्यानंतर पोलिसांनी गौरीकडे सखोल चौकशी केल्यावर तिने गुन्हा कबुल केला.

गौरी हिने लोन अ‍ॅपद्वारे कर्ज घेतले होते़ कर्ज फेडण्यासाठी सायबर चोरट्यांनी तिच्याकडे तगादा लावला होता. नाही तर तुझे अश्लिल फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देत होते. आपली बदनामी टाळण्यासाठी तिने हा चुकीचा मार्ग निवडला. त्यातून तिने कर्ज फेडण्यासाठी मंगळवारी सकाळी आजीचा खून केला. तिच्या घरातील १ तोळ्याचे मंगळसुत्र व ३६ हजार रुपये घेऊन पळ काढला. त्यानंतर तिने ते मंगळसुत्र २० हजार रुपयांना विकले. त्यातील १३ हजार रुपये तिने सायबर चोरट्याने दिलेल्या खात्यावर भरले. हा सर्व प्रकार समोर आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला आहे.

टॅग्स :PuneपुणेWarje Malwadiवारजे माळवाडीCrime Newsगुन्हेगारी