शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

दुर्वा काढताना निरा डावा कालव्यात पडलेल्या आजींना तरुणामुळे मिळाले जीवदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 21:33 IST

शहरातील माळावरची देवी परिसरात गणपतीला दुर्वा काढण्यासाठी आलेल्या ८० वर्षीय आजी अनवाधानाने निरा डावा कालव्यात पडल्या.

ठळक मुद्देदिवसभर सोशल मीडियावर सिकची यांच्या कौतुकाचा वर्षाव सुरु

बारामती : शहरातील माळावरची देवी परिसरात गणपतीला दुर्वा काढण्यासाठी आलेल्या  ८० वर्षीय आजी अनवाधानाने निरा डावा कालव्यात पडल्या. त्यांना पोहता येत नसल्याने आजीबाई कालव्यात बुडु लागल्या. सुदैवाने यावेळी ‘मॉर्निंग वॉक’ साठी आलेल्या तरुणाने हा प्रकार पाहुन थेट कालव्यात उडी घेतली. त्या तरुणाने मोठ्या धाडसाने कालव्यात बुडणाऱ्या आजींना शिताफीने कालव्याच्या काठावर आणले. या युवकाने दाखविलेल्या प्रसंगावधानतेमुळे अखेर वृध्द महिलेला जीवदान मिळाले.मंगळवारी (दि १८ )सकाळी ८ वाजता घडलेल्या या घटनेची शहरात जोरदार चर्चा झाली.बारामती शहरातील संगम पूल ते माळावरच्या देवीकडे कालव्यावरुन जाणारा हा रस्ता दररोज सकाळी कायम गजबजलेला असतो.या मार्गावर व्यायाम,मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. ८० वर्षीय आजी आज सकाळी निरा डावा कालव्यात बुडताना येथील वास्तुविशारद मंदार सिकची यांना दिसल्या. पाण्याला वेग असल्याने त्या आजी कालव्याच्या मध्यभागी बुडत होत्या. मात्र, सिकची यांनी कोणताही विचार न करता अजिबात वेळ न घालवता धावत जाऊन उडी मारली.कालव्यात बुडणाऱ्या आजींना गाठुन त्यांना कालव्याच्या काठावर आणले. यावेळी आजी खुप घाबरुन गेल्या होत्या.यावेळी सिकची यांच्याबरोबर व्यायामाला असणारे माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, दीपक बनकर यांनी देखील पुढे येत त्या महिलेला बाहेर काढले यावेळी आजीबाई प्रचंड घाबरुन गेल्या होत्या. मात्र, तिघांनी त्यांना मानसिक आधार दिला. त्यांची विचारपुस केली.त्यामुळे काही वेळातच या आजी झालेल्या प्रकारातुन सावरल्या.या दरम्यान आजींना चहा आणुन पाजण्यात आला. त्यावेळी थोडी तरतरी आलेल्या आजींंनी त्यांनी आडनाव वायसे (पुर्ण नाव समजु शकले नाही) असल्याचे सांगितले. त्या बहुतेक कालव्याच्या कडेला दुर्वा काढण्यासाठी आल्या असाव्यात असा अंदाज येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. आज घडलेली घटना बारामती शहरात चर्चेचा विषय ठरली.दिवसभर सोशल मीडियावर सिकची यांच्या कौतुकाचा वर्षाव सुरु होता. सिकची कुटुंबीय तसे तर नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असते. आज एक बुडणाऱ्या आजींचा जीव वाचवून मंदार यांनी हा वारसा सुरु  ठेवल्याचे अधोरेखित केले. स्वतः जीवाची बाजी लावुन ओसंडुन वाहणाऱ्या निरा डावा कालव्यात उडी घेउन कालव्यात पाय घसरुन पडलेल्या आजींना जीवदान देणाऱ्या ‘मंदार’ यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या कार्याला आमचा सलाम, असे विविध संदेश बारामतीकरांनी सोशल मीडीयावर ‘व्हायरल’ केले. 

टॅग्स :BaramatiबारामतीSocial Mediaसोशल मीडिया