शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

आजीची माया! १६ वर्षांपासून पक्ष्यांना भरवतेय प्रेमाचा घास; पिकवली दोन एकरात ज्वारीची शेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 18:00 IST

इंदापुरातील सरस्वती सोनवणे गेल्या पंधरा वर्षापासून सुरू आहे उपक्रम...

बाभुळगाव (पुणे):इंदापूर (आंबेडकर नगर) येथील ८२ वर्षीय सरस्वती भिमराव सोनवणे या आजीने आई वडिलांची जुणी आठवण जपण्यासाठी आपल्या शेतातील काढणीस आलेले ज्वारीचे सव्वादोन एकर उभे पिक हे चिमण्या पाखरांना व पक्षांना खाण्यासाठी राखीव ठेवले आहे. त्यांचे शेतातील ज्वारीचे पिकावर दररोज हजारो चिमण्या-पाखरे ताव मारून तृृप्त होत आहेत. या परिसरात पक्षी व पाखरांचा वाढता वावर व सरस्वती आजीचे पक्षी व पाखरांच्या प्रति असणारे प्रेम हे इंदापूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

गेल्या सोळा वर्षापासून सरस्वती सोनवणे आजी या आई वडिलांच्या प्रेमापोटी शेतातील उभे पिक पाखरांना खाण्यासाठी राखुव ठेवत आहेत. त्याचबरोबर शेतात येणार्‍या पखरांना पिण्यासाठी विकतचे पाणी घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिक बाटल्या, मडकी, प्लास्टिक कागद यामध्ये सोय करून पक्षी व पाखरांना मित्र बनवून त्यांची मनोमन सेवा करत आहेत. ८२ वर्षीय सरस्वती आजीच्या पक्षीसंवर्धन प्रेमाची चर्चा ऐकून अनेक पक्षीप्रेमी हे सरस्वती आजीची भेट घेऊन त्यांच्या उपक्रमाचे व पक्षीप्रेमाचे कौतुक करत आहेत. 

रब्बी हंगामात देश विदेशातून वेगवेगळ्या जातीचे असंख्य पक्षी व पाखरांचे थवेच्या थवे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात येऊन अनेक दिवस वास्तव्य करतात. वास्तव्यास असलेले पक्षी व पाखरे हे अन्न पाण्यासाठी शेत शिवारात भटकताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो व शेतकर्‍यांनाही त्यांचा त्रास होतो. काढणीस आलेल्या पिकावर पक्षांचे थवे बसल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असताना इंदापूरातील सरस्वती आज्जी याला अपवाद ठरल्या असुन त्या गेल्या सोळा वर्षापासून पक्षी संवर्धनाचे काम करत आहेत. स्वतःच्या शेतातील ज्वारीचे पिक हे पाखरांना खाण्यासाठी राखीव ठेवण्याचा उपक्रम त्या राबवत आहेत.   सरस्वती आजीनी या वर्षी पाखरांना खाण्यासाठी स्वत:चे मालकीचे सव्वादोन एकर क्षेत्र हे ज्वारीच्या पिकासह राखीव ठेवले आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या मुलांचीही चांगली साथ मिळत आहे. सदर शेतीसाठी पाणी कमी पडल्यास विकतचे पाणी घेऊन त्या पीक जगवतात. त्यांचे मुलांचे मत जाणून घेतले असता आमची आई जे काय करेल त्यात आम्ही समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. तर सरस्वती आजी या दररोज सकाळी भाकरी बांधून शेतात जाऊन दिवसभर शेतातील चिमण्यां पाखरांसह वेळ घालवतात. आजी गरीब कटुंबातील असूनही त्यांचे चिमण्या-पाखरांवरील प्रेम हे गेल्या सोळा वर्षांपासून जसेच्या तसे असल्याने सरस्वती आजी इंदापूर परिसरात कुतुहलाचा विषय ठरत आहेत.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरbirds sanctuaryपक्षी अभयारण्यpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड