शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

खाकीतील माणुसकीमुळे आजोबांना सापडले कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 00:44 IST

पोलीस म्हटले, की कठोरपणा... मात्र त्यांच्यात मायेचा ओलावाही असतो. बारामती तालुक्यातील एका घटनेतून माणुसकीचे दर्शन घडले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीमुळे प्रवासात हरवलेल्या आजोबांना आपले कुटुंब सापडले.

- संतोष भोसलेवडगाव निंबाळकर : पोलीस म्हटले, की कठोरपणा... मात्र त्यांच्यात मायेचा ओलावाही असतो. बारामती तालुक्यातील एका घटनेतून माणुसकीचे दर्शन घडले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीमुळे प्रवासात हरवलेल्या आजोबांना आपले कुटुंब सापडले.वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले सहायक फौजदार प्रल्हाद नारायण जगताप रविवारी (दि. ५) कामावरून घरी जात होते. सुपा- मोरगाव येथे एक थकलेले आजोबा रस्त्याच्या कडेला बसलेले आढळून आले. त्यांनी आजोबांची विचारपूस केली. थकलेल्या आवाजात आपण प्रवासात चुकल्याचे सांगितले. पण त्यांना नाव, गाव सांगता नव्हते. तब्येत बरी दिसत नसल्याचे जगताप यांना जाणवले. त्यांनी लागलीच १०८ रुग्णवाहिकेला बोलावून त्यातून सुपे येथील ग्रामीण रुग्णालयात त्या वृद्धाला दाखल केले. डॉक्टरांना विनंती करून त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यास सांगितले. त्यानंतर होमगार्ड महेंद्र शिवतारे यांना आजोबांची काळजी घेण्यास सांगितले. तीन दिवस शिवतारे यांनी त्यांची देखभाल केली. स्वत: घरून जेवणाचा डबा देत, औषधपाणी केले. भरपूर प्रयत्न करूनदेखील आजोबांकडून माहिती नीट मिळत नव्हती. मी हरवलो आहे आणि मला घरी जायचंय, एवढेच ते बोलत होते.त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेवून आजोबांची माती दिल्यानंतर कुटुंबीय दवागान्यात आले. त्यांना पाहून नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. तेथे हजर असलेले होमगार्ड शिवतारे, रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांतदेखील अश्रू आले.वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार जगताप, होमगार्ड शिवतारे यांनी केलेल्या कृत्यातून खाकी वर्दीतील पोलिसांच्या ठायी असलेल्या माणुसकीचा प्रत्यय परिसरातील नागरिकांना आला. त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.जगताप व शिवतारे यांनी आजोबांकडे सापडलेल्या डायरीतून फोन नंबरवर संपर्क करून त्या आजोबांबद्दल व्यक्तीचे नातेवाईक शोधण्याचा प्रयत्न केला. पण फोन नंबर चुकीच्या ठिकाणी जात होते. त्यामुळे नातेवाईकांशी संपर्क होत नव्हता.अखेर आजोबांची तब्येत ठीक झाल्यावर त्यांनी आपले नाव प्रभाकर शंकर देवळालीकर (रा. शिवाजीनगर, (सांगवी), पुणे) असल्याचे सांगितले.नाव, पत्त्यावरून तपास करीत तेथील स्थानिक नगरसेवकांमार्फत नातेवाईकांशी संपर्क साधला. माहिती मिळताच बुधवारी (दि. ८) आजोबांचे नातेवाईक सुपे येथील रुग्णालयात आले. या आजोबांची आणि नातेवाईकांची भेट झाली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस