नीरा डावा कालव्यात पडून आजोबा-नातीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:11 IST2021-05-10T04:11:28+5:302021-05-10T04:11:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : नीरा डावा कालव्यात दुचाकी पडल्याने झालेल्या अपघातात आजोबांसह नातीला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे ...

Grandfather and grandson die after falling into Nira Dawa canal | नीरा डावा कालव्यात पडून आजोबा-नातीचा मृत्यू

नीरा डावा कालव्यात पडून आजोबा-नातीचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती :

नीरा डावा कालव्यात दुचाकी पडल्याने झालेल्या अपघातात आजोबांसह नातीला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी (दि ९) सकाळी पाटस रस्त्यावरील तीन मोऱ्यानजीक ही दुर्दैवी घटना घडली.

उत्तम नामदेव पाचांगणे (वय ५२, रा. सातववस्ती, बारामती), समृद्धी विजय चव्हाण (वय १२, रा. कुरकुंभ, ता.दौंड) असे आजोबा, तसेच नातीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: रविवारी (दि ९) सकाळी पाचांगणे कुरकुंभ येथून त्यांच्या नात समृध्दीसह दुचाकीवरून बारामतीला निघाले होते. यावेळी त्यांनी सकाळी दहाच्या सुमारास पाटस रस्त्यावरून त्यांची दुचाकी नीरा डावा कालव्याशेजारील भरावावरून सातववस्तीकडे नेली. या ठिकाणी काही अंतरावर तीन मोऱ्या आहेत. एका बाजूला नीरा डावा कालवा, तर दुसऱ्या बाजूला कऱ्हा नदी असा हा इंग्रजांच्या काळात नदीवर कालव्यासाठी बांधलेला पूल आहे. या पुलाच्या भरावाच्या शेवटच्या टोकापर्यंत पाचांगणेना दुचाकी व्यवस्थित नेता आली. मात्र, ते शेवटच्या टोकानजीक गेल्यावर ते दुचाकी सावरू शकले नाहीत. यावेळी त्यांनी पाय खाली टेकविण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, दोघांसह नीरा डावा कालव्यात दुचाकी कोसळली. या ठिकाणी कालव्यात पाण्याचा प्रवाह वेगाने वाहतो. परिणामी, पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाने हे दोघेही वाहून जाऊ लागले, शेवटी उत्तम यांनी समृध्दीला वाचविण्यासाठी शेवटपर्यंत आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. या घटनेत दोघांचाही दुर्दैवी अंत झाला. स्थानिकांनी आजोबा आणि नातीला पाण्यातून बाहेर काढले. या घटनेमुळे पाचांगणे व चव्हाण परिवारावर शोककळा पसरली आहे. पत्रकार कल्याण पाचांगणे यांचे उत्तम हे चुलत बंधू होत.

Web Title: Grandfather and grandson die after falling into Nira Dawa canal