शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक युनियनचे इंदापुरात धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:24 IST

विस्तार अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची मागणी; कामगारांवर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप

इंदापूर : तालुक्यातील पंचायत समिती विस्तार अधिकारी घनश्याम दराडे हे कामगारांचे आर्थिक, मानसिक संतुलन बिघडवून खच्चीकरणकरीत असल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करावे, या मागणीसाठी इंदापूर तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने सोमवारी (दि. २०) पंचायत समितीच्या प्रांगणात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचेमुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन स्वरूपात नोटीस देण्यास आले आहे.युनियनच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले आहे. आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात २७ आॅगस्टपासून ग्रामसेवक काम बंद आंदोलन करतील आणि जोपर्यंत विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन माघार घेणार नाहीत.मुख्याधिकारी यांच्याकडील चौकशीच्या आदेशातील मुद्द्यांशिवाय अनावश्यक मुद्द्यांची तपासणी करून ग्रामसेवकांचे मानसिक संतुलन बिघडविणे व खच्चीकरण करणे, तपासणीकामी दप्तरांची तपासणी न करता ‘दप्तर उपलब्ध नाही’ असा अहवाल तयार करणे, ग्रामसेवकांना कामकाजासंबंधी मार्गदर्शन न करणे, ग्रामसेवकांचा चुकीचा अहवाल तयार करून निलंबन करण्याची धमकी देणे, ग्रामसेवकांची तपासणीच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक करून मनमानी कारभार करणे, ग्रामसेवकांचे दप्तर तपासण्यासाठी घरी घेऊन जाणे, तपासणीकामी दप्तरात उपलब्ध असताना ‘नाही’ असा अहवाल तयार करणे, वरिष्ठ अधिकाºयांना हाताशी धरून ग्रामसेवकांना निलंबनाची धमकी देणे, वेगवेगळी कारणे सांगून वरिष्ठांच्या नावाखाली वर्गणी गोळा करणे असे आरोप युनियनच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष नीलकंठ गिरी यांनी दिली. या वेळी युनियनचे सचिव लक्ष्मीकांत जगताप, उपाध्यक्ष संजय यादव, अरुण आवळे, महिला उपाध्यक्षा अर्चना लोणकर, सहसचिव अमोल मिसाळ आदी तालुक्यातील ग्रामसेवक धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.ग्रामसेवकांनी केलेल्या तक्रारींचे स्वागत असून, मी निवेदन वाचले आहे. झालेल्या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- करणसिंह घोलप, सभापतीइंदापूर पंचायत समिती

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणे