गर्भलिंग निदानप्रकरणी ग्रामसेवक पतीला अटक
By Admin | Updated: July 27, 2016 03:58 IST2016-07-27T03:58:13+5:302016-07-27T03:58:13+5:30
मुली होत असल्याने विवाहितेचे गर्भलिंग निदान करून जबरदस्तीने गर्भपात केल्याच्या प्रकरणातील आठ आरोपींपैकी विवाहितेचा ग्रामसेवक पती महेंद्र दिगंबर लोणकर

गर्भलिंग निदानप्रकरणी ग्रामसेवक पतीला अटक
वडगाव निंबाळकर : मुली होत असल्याने विवाहितेचे गर्भलिंग निदान करून जबरदस्तीने गर्भपात केल्याच्या प्रकरणातील आठ आरोपींपैकी विवाहितेचा ग्रामसेवक पती महेंद्र दिगंबर लोणकर (रा. माळवाडी ता. बारामती) याला वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. अन्य अजुनही फरार आहेत.
बारामती तालुक्यातील लोणी भापकरनजीक माळवाडी येथील विवाहितेचे गर्भलिंग निदान करून जबरदस्तीने गर्भपात केल्याच्या प्रकरणी एका कुटुंबातील पाच जणांवर, गर्भपात करण्यास मदत करणारे अज्ञात दोन इसम व डॉक्टर अशा आठ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत विवाहितेने तक्रार दिली होती. चार वर्षांपूर्वी लग्न झाल्यापासून पहिल्यांदा मुलगी झाल्यानंतर घरातील व्यक्तींनी छळ करत गर्भलिंग निदान करून जबरदस्तीने गर्भपात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून एक आरोपीस अटक केली आहे. इतर सात आरोपी अजूनही फरार आहेत.
ग्रामसेवक पदाचा कारभार सांभाळणाऱ्या एका जबाबदार व्यक्तीकडून असे कृत्य केले
आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर
असून, यात आरोपी असलेले, गर्भपात करण्यास मदत करणारे अज्ञात दोन इसम व डॉक्टर यांना लवकरात
लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावर
कठोर कारवाई करावी, अशी
मागणी भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी केली आहे.(वार्ताहर)