ग्रामपंचायतीचा गाळा पाडला
By Admin | Updated: December 26, 2016 02:35 IST2016-12-26T02:35:02+5:302016-12-26T02:35:02+5:30
यवत गावच्या मुख्य बाजारपेठेत ग्रामपंचायत मालकीचा व्यापारी गाळा अनधिकृतपणे पाडण्यात आला. ग्रामपंचायत प्रशासनाने गाळा भुईसपाट होऊन

ग्रामपंचायतीचा गाळा पाडला
यवत : यवत गावच्या मुख्य बाजारपेठेत ग्रामपंचायत मालकीचा व्यापारी गाळा अनधिकृतपणे पाडण्यात आला. ग्रामपंचायत प्रशासनाने गाळा भुईसपाट होऊन नवीन बांधकाम सुरू करण्यात आल्यानंतर संबंधित जागेवर कोणीही नवीन बांधकाम केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची सूचना दिली आहे.
ग्रामपंचायत मालकीचा गाळा क्र. १६ ग्रामपंचायतीची कसलीही परवानगी न घेता अनधिकृतपणे भुईसपाट करण्यात आला तर त्याच वेळी संबंधित जागेवर नवीन इमारतींचे बांधकामदेखील सुरू करण्यात आले होते. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला जाग येऊन गाळा भुईसपाट करण्यात आल्यानंतर तेथे सूचनाफलक लावून ग्रामपंचायतीने कारवाई करण्याची सूचना दिली आहे.
अचानक घडलेल्या घडामोडीमुळे सद्य परिस्थितीत गाळा क्र. १६ मात्र पूर्णपणे भुईसपाट झाला असून याबाबत संबंधितांवर काय कारवाई केली जावी.
याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने गटविकास अधिकारी दौंड यांच्याकडे अभिप्राय मागविला आहे. गटविकास अधिकारी यांनी याबाबत सूचना दिल्यानंतर संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.(वार्ताहर)