भोरमधील ग्रामपंचायतीत सत्तांतर
By Admin | Updated: October 30, 2015 00:05 IST2015-10-30T00:05:41+5:302015-10-30T00:05:41+5:30
तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींच्या ३० जागांपैकी १३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. १७ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

भोरमधील ग्रामपंचायतीत सत्तांतर
भोर : तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींच्या ३० जागांपैकी १३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. १७ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. गावातील राजकीय नेत्यांच्या दृष्टीने ग्रामपंचायतीची निवडणूक महत्त्वाची असल्याने अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत पेंजळवाडी व आळंदेवाडी, कासुर्डी खे.बा ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे.
भोर तालुक्याच्या पूर्व भागातील पेंजळवाडी ग्रामपंचायतीच्या ७ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या आहे. ४ जागांसाठी ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झालेल्या तीनपैकी २, तर निवडणूक लागलेल्या चारपैकी तीन, अशा ७ पैकी पाच जागा जिंकून ग्रामपंचायत कॉँग्रेसने ताब्यात घेतली आहे. यात गजानन किसन चव्हाण (११७ मते विजयी), कल्पना बाळू चव्हाण (९१ मते विजयी), विजय नारायण चव्हाण (७८ मते), सारिका गजानन चव्हाण(२०० मतेविजयी), तर हेमलता चंद्रकांत चव्हाण, सारिका प्रकाश चव्हाण, विलास रमेश चव्हाण हे बिनविरोध निवडून आले आहेत. महामार्गावरील महत्त्वाची असलेली कासुर्डी खे.बा ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण असून ९ जागांसाठी १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात संतोष वामन गायकवाड (२०५ मते विजयी), कविता राहुल लाड (२०६ मते विजयी), स्वाती श्रीकांत लाड (२०१ मते विजयी), शकुंतला तुकाराम नागडे (१६९ मते विजयी), सुधाकर ज्ञानोबा कोंडे (१६० मते विजयी), संभाजी बबन नागडे (१८४ मते विजयी), वैशाली अशोक खाडे (१७५ मते विजयी), शकुंतला तुकाराम नागडे (१८४ मते विजयी), कल्पना अशोक कोंडे (१६५ मते विजयी), संतोष कोंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे.
गोकवडी ग्रामपंचायतीच्या ७ पैकी ५ जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर २ जागांसाठी ४ उमेदवार निवडणूक लढवत होते. यात इंदुबाई रमेश बांदल (७६ मते विजयी),रणधीर गोपाळ चव्हाण (१०६ मते विजयी), हय्याज अब्दुल शेख, रंजना पांडुरंग पवार, पौर्णिमा संदीप बांदल, सागर कृष्णा बांदल, धनश्री गणेश बांदल हे बिनविरोध निवडून आले आहेत. सरपंचपद सर्वसाधारण आहे.
आळंदेवाडीत ७ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. २ जागांसाठी ४ उमेदवार निवडणूक लढवत होते, यात रवींद्र गेनबा गाडे (१०१ मते विजयी), प्रतिभा मधुकर पवार (१४८ मते विजयी), तर रेखा अरविंद गाडे, सतीश दत्तात्रय बरदाडे, छाया राहुल गव्हाणे, गणेश दत्तात्रय धोत्रे, चांदणी भगवान सणस हे बिनविरोध निवडून आले आहेत.