शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
4
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
5
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
6
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
7
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
8
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
9
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
10
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
11
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
12
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
13
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
14
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
15
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
16
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
17
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
18
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
19
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
20
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 

ग्रामपंचायत निवडणूक: संख्याबळासाठी पक्षांचे दावे-प्रतिदावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 2:17 AM

पुणे जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींपैकी ४९ बिनविरोध व उर्वरित १७३ ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी लागला. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढण्यास बंदी असल्यामुळे निवडणुकीपर्र्यंत गावकी, भावकीचे राजकारण तापले होते.

पुणे जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींपैकी ४९ बिनविरोध व उर्वरित १७३ ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी लागला. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढण्यास बंदी असल्यामुळे निवडणुकीपर्र्यंत गावकी, भावकीचे राजकारण तापले होते. मात्र निकालानंतर आता पक्षीय राजकारण पेटले आहे. संख्याबळासाठी आता दावे प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात आघाडीवर असून काँग्रेसदुसºया क्रमांकावर आहे. शिवसेनेलाही शिरूर, हवेली लोकसभा मतदार संघात बºयापैकी चांगले यश मिळाले आहे. सत्ताधारी भाजपाला मात्र या निवडणुकीत गावकीच्या राजकारणात म्हणावे तसे शिरता आले नाही. ११ ग्रामपंचायती त्यांना मिळाल्या आहेत. आता निवडून आलेल्या सरपंचांना सत्काराचे आमंत्रण देवून तो आपलाच असे दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.शिरूरमध्ये भाजपाला आत्मपरीक्षणाची गरजशिरूर : नुकत्याच पार पडलेल्या तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व राखत विधान सभेच्या पराभवानंतरही त्यानंतरच्या निवडणुकांतील विजयी घोडदौड सुरू ठेवण्यात यश मिळविले. भाजपा पुन्हा बॅकफूटवर राहिल्याचे दिसून आले.विधानसभा निवडणुकीत भाजपाचा उमेदवार शिरूर हवेली या मतदारसंघातून निवडून आला. तालुक्यातील बहुतांशी संस्थांवर वर्चस्व असताना झालेला पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला होता. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी मोदीलाट, वगैरे या पराभवाची कारणे आहेत. या निवडणुकीनंतर झालेल्या घोडगंगा सरकारी साखर कारखाना, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती तसेच खरेदी-विक्री संघ आदी निवडणुकांत मात्र राष्ट्रवादीने मुसंडी मारली.दरम्यान या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. प्रथमच जनतेतून सरपंच निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली.यातही राष्ट्रवादीने चार पैकी तीन ग्रामपंचायतीत आपले वर्चस्व राखले. करंजावणे येथे जो सरपंच निवडला गेला त्याने मी कोणत्याच पक्षाचा नाही, असे सांगितल्याने ती ग्रामपंचायत भाजपची म्हणण्यासही जागा राहिली नाही.विधानसभेनंतर झालेल्या सर्वच निवडणुका हारल्याने भाजपा जनतेने कार्य अर्थ काढायचा तो काढला आहे. तालुक्यातील थोड्याच ग्रामपंचायतीचे निवडणुका होत्या. मात्र ज्या गावांत भाजपाचे बळ आहे, त्या मांडवगण फराटा गावांत राष्ट्रवादीचा सरपंच निवडणून आल्याने भाजपालाआता आत्मपरिक्षणाची गरज निर्माण झाली आहे.ंसरपंचपदी रासपा-भाजपा महायुतीचे बाबा जाधव विजयीराजेगाव : लोणारवाडी (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रासपा-भाजपा महायुतीप्रणित श्री मुंजाबा ग्रामविकास पॅनलचे बाबा नामदेव जाधव यांचा ३० मतांनी विजय झाला.राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित श्री मुंजाबा परिवर्तन पॅनलचे ९ पैकी ५ उमेदवार विजयी झाल्याने या ग्रामपंचायतीत सरपंच एकाचा व बहुमत दुसºयाचे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.नुकत्याच अतिशय चुरशीने झालेल्या निवडणुकीत ९६४ पैकी ८९१ म्हणजे ९२:४२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पूर्व भागातील एकमेव असणाºया या निवडणुकीकडे संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष लागले होते.सरपंचपद अनुसूचित जाती पुरुषासाठी आरक्षित होते. एकास एक अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत बाबा नामदेव जाधव यांना ४६० व राजेंद्र दामोधर लोंढे यांना ४३० मते मिळाली. ३० मतांनी जाधव विजयी झाले.रासपा-भाजपाप्रणित श्री मुंजाबा ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच अंबादास गाढवे, गोरख गाढवे, उपसरपंच हनुमंत वाळुंजकर, संदीप वाघ आणि दत्तात्रय पुणेकर यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित श्री मुंजाबा परिवर्तन पॅनलचे नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक माणिकराव पुणेकर, हरिश्चंद्र वाळूंजकर, दशरथ वाघ, वाल्मीक पुणेकर आणि श्रीधर गाढवे यांनी केले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी मंगेश नेवसे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गावकामगार तलाठी दीपक पांढरपट्टे यांनी काम पाहिले.या वेळी चेअरमन गोरख गाढवे म्हणाले, की प्रस्थापितांविरोधात आम्ही निवडणूक लढविली होती. आठ दिवसांपूर्वी सोसायटीच्या निवडणुकीत १३-० आणि आज सरपंचपद आम्हाला मिळाले. हा जनतेने विकासकामाला दिलेला कौल आहे.माणिक पुणेकर म्हणाले, की गेल्या पाच वर्षांत विकासकामे करताना सत्ताधाºयांनी पैसे खाल्ले; तसेच पैसे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वाटले. अगदी निसटत्या मतांनी सरपंचपद हरलो असलो तरी आमचे जास्त सदस्य निवडून आल्याने बहुमत आमचेच असून उपसरपंच आमचाच होणार आहे. एका अर्थाने विरोधकांचा हा नैतिक पराभवच आहे.भोर तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींत परिवर्तनभोर : भोर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींत अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अधिक जागा मिळाल्याचा दावा केला असला तरी संमिश्र यश मिळाले आहे. तर शिवसेना, भाजपाला यश मिळवता आले नाही. सदर निवडणुकीत जेवणावळी, भेटवस्तू व पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यामुळे अनेक गावांत क्रॉस व्होटिंग होऊन अनेक दिग्गज नेत्यांच्या ग्रामपंचायती हातातून गेल्या असून, परिवर्तन झाले तर अनेकांनी आपले गड कायम राखले आहेत.काही गावांत अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत वेळवंड व ब्राह्मणघर गावांत दोन मतांनी सरपंच विजयी झाले आहेत. तर म्हाकोशी येथे सदस्य निवडणुकीत समान मते पडल्याने चिठ्ठीवर निवड जाहीर करण्यात आली.वेल्हे रोडवरील कुरुंगवडी ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवून सर्वच्या सर्व जागा जिंकून सत्ताधारी पॅनलचा दारुण पराभव केला. तर कर्नावड ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसच्या पॅनलने विरोध शिवसेना राष्ट्रवादी पॅनलचा दारुण पराभव करून सरपंचपदासह सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आणि पुन्हा सत्ता ताब्यात ठेवली.भाटघर धरण भागातील पसुरे ग्रामपंचायत निवडणुकीत काँॅग्रेस विरुद्ध सत्ताधारी राष्ट्रवादी पॅनलमध्ये लढत झाली. काँॅग्रेसने सरपंचपदासह चार जागा मिळवत गतवेळी गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणली. राजघर, येवली, बारे खुर्द, वाठारहिंगे ग्रामपंचायत निवडणुकीतही काँग्रेसने सर्व जागा जिंकून विजय मिळवला. भांबवडे व कारी ग्रामपंचायतीत सरपंच काँग्रेसचा, तर सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसने वाठार हि.मा, ब्राह्मणघर वे. खो या ग्रामपंचायतीत काँग्रेसच्या पॅनलचा पराभव केला आहे. तर सांगवी तर्फे भोर, तेलवडी, कासुर्डी. गु.मा, सांगवी बुद्रुक, सांगवी खुर्द, वीरवाडी, सांगवी भिडे या ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. ५४ पैकी २८ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्याचे जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांनी सांगितले तर पारवडी ग्रामपंचायत संभाजी ब्रिगेडच्या ताब्यात गेली आहे.नसरापूर गणातील निवडणूक लागलेल्या ९ पैकी ७ ग्रामपंचायती माजी उपसभापती विक्रम खुटवड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँॅग्रेसच्या ताब्यात आल्याचे पंचायत समितीचे उपसभापती लहू शेलार यांनी सांगितले.दौंडला ६ ग्रामपंचायतींवर थोरात गटाचे वर्चस्वदौंड : तालुक्यात ८ ग्रामपंचायतींपैकी ६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला, तर विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला सरपंचपदाच्या दोन जागा मिळाल्या.थेट ग्रामस्थांतून सरपंचपदाला मतदान असल्याने लागलेल्या निकालाला गटातटाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व आहे.राजकीय पक्ष वगळता दौंड तालुक्यात कुल-थोरात या दोन गटापुढे राजकारण फिरत असल्याची वस्तुस्थिती आहे. कारण विरोधक हा प्रबळ नसल्याने त्याचा फायदा मात्र कुल-थोरात गटाला मिळत आहे.डाळिंब, नांदूर, बोरीभडक, दापोडी, पाटेठाण, देवकरवाडी या सहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर थोरात गटाचे, तर दहिटणे आणि लोणारवाडी या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर राहुल कुल गटाचे वर्चस्व राहिले.दरम्यान आठ ग्रामपंचायतींत निवडून आलेले सदस्य हे दोन्ही गटांतील आहेत.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने तालुक्यात गटातटाचे राजकारण उफाळून आले होते. तर दोन्ही गटाने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.सध्याच्या परिस्थितीत विद्यमान आमदार राहुल कुल यांनी तालुक्यात विकासासाठी ९00 कोटी रुपये आणल्याचा गाजावाजा केला होता. मात्र मतदारांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पाठोपाठ आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कुल गटाकडे पाठ फिरवली असल्याची वस्तुस्थिती आहे. तर दुसरीकडे भीमा पाटस कारखान्याचा फटका दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आणि नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतदेखील राहुल कुल यांना बसला असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार कारखाना सुरू झाल्याशिवाय आणि त्यातील समस्या पूर्वपदावर आल्याशिवाय कुल यांचे राजकीय भवितव्य अंधातरी राहील, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.दापोडी ग्रामपंचायतीला वास्तविक

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणे