शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मावळ तालुक्यात राजकारण्यांचे मनोमिलन; एक सरपंच बिनविरोध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 12:45 IST

आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेत या ग्रामपंचायत निकालावर सर्वांचे लक्ष...

- प्रसाद कुटे

कामशेत (पुणे) : राज्यातील सत्ता बदलाचे परिणाम तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवर दिसत असून मावळ तालुक्यात शिरगाव ग्रामपंचायत वगळता इतर आठ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होत असल्याने गाव पातळीवर तालुक्यातील राजकीय हस्तक्षेप प्रकर्षाने जाणवत आहे. राजकीय अस्तित्व प्रतिष्ठा व आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेत या ग्रामपंचायत निकालावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

यामध्ये तालुक्यातील राजकारणाचा प्रभाव प्रभावीपणे पेलत व गावचे गावपण टिकविण्यात शिरगाव ग्रामपंचायत यशस्वी झाले असून येथील सर्व उमेदवार व सरपंचपदाचा उमेदवार बिनविरोध झाले आहेत तर तळेगाव शहरालगत असणाऱ्या इंदोरी गावाचे सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत.

इंदोरी ग्रामपंचायतीचे सर्व १७ सदस्य बिनविरोध

शिरगाव ग्रामपंचायत येथील सरपंचपदाचा उमेदवार व सर्व नऊ सदस्य बिनविरोध झाले असून सरपंचपद वगळता इंदोरी ग्रामपंचायतचे सर्व १७ सदस्य बिनविरोध झाले आहेत.

नऊपैकी आठ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका

शिरगाव ग्रामपंचायत वगळता इतर सर्व ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामध्ये सर्वांत जास्त जागा असणाऱ्या इंदोरीमध्ये सर्व सदस्य बिनविरोध झाले असून सरपंचपदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत.

गावनिहाय बिनविरोध सदस्य संख्या

गोडुंब्रे - एकूण सदस्य संख्या तीन

देवले - गाव एकूण सदस्य संख्या सहा

भोयरे - एकूण सदस्य संख्या एक

सावळे - एकूण सदस्य संख्या तीन

शिरगाव - एकूण सदस्य संख्या नऊ

वरसोली - एकूण सदस्य संख्या चार

कुणे ना.मा. - एकूण सदस्य संख्या एक

निगडे - एकूण सदस्य संख्या नऊ

इंदोरी - एकूण सदस्य संख्या १७

निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले एकूण उमेदवार संख्या

गाव   लढत जागा   उमेदवार (सरपंच)   उमेदवार (सदस्य)

गोडुंब्रे   ०४             ०४             ०८

देवले   ०१             ०४             ०२

भोयरे   ०६             ०३             १३

सावळे   ०३             ०२             ०६

वरसोली   ०५             ०२             १०

कुणे ना.मा.  ०८             ०४             १९

निगडे        ०९             ०२             १८

इंदोरी -             ०३             -

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकmavalमावळ