पीओएस प्रणालीद्वारे धान्यवितरण

By Admin | Updated: January 14, 2017 02:59 IST2017-01-14T02:59:43+5:302017-01-14T02:59:43+5:30

पुणे जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी येथील स्मिता भोर यांच्या दुकानाची निवड करण्यात आली.

Grain Delivery by POS System | पीओएस प्रणालीद्वारे धान्यवितरण

पीओएस प्रणालीद्वारे धान्यवितरण

अवसरी : पुणे जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी येथील स्मिता भोर यांच्या दुकानाची निवड करण्यात आली. त्यानुसार ग्राहकांच्या समोर पीओएस प्रणालीचा वापर करून प्रत्यक्ष धान्याचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा विभागाने संपूर्ण धान्याच्या वाटपासाठी ईपीडीएस प्रणाली सुरू केली आहे. आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी येथील स्वस्त धान्य दुकांनामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी व ग्रामस्थांसमोर पीओएस मशीनद्वारे प्रणालीचा वापर करून प्रत्यक्ष धान्याचे वितरण करण्यात आले. प्रत्येकी ४ कार्डधारकांना मशीनद्वारे शिधा वस्तूंचे यशस्वीरीत्या वितरण करण्यात आले.
अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेला सधन शिधापत्रिका धारकांनी स्वत:हून या योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांनी केले. अशा तऱ्हेने योजनेमधून बाहेर पडणाऱ्या शिधापत्रिकेऐवजी गोरगरीब लोकांसाठी अन्नधान्याचा उपयोग होईल, असे ते म्हणाले. या वेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, जिल्हा पुरवठा तहसीलदार उत्तम बढे, जिल्हा पुरवठा अव्वल कारकून अनिल टेमक, पुरवठा निरीक्षक फकिरा मंडलिक, जिल्हा टेक्निकल पर्सन संतोष देशमुख, एनआयसी प्रतिनिधी विठ्ठल गायकवाड, मंडलाधिकारी दीपक मडके, कामगार तलाठी आर. एल. इलग उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील पी. व्ही. खुराणा
यांच्या स्वस्त धान्य दुकानाचीही पीओएस मशीनद्वारे प्रणालीचा वापर करून प्रत्यक्ष धान्याचे वितरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
(वार्ताहर)

Web Title: Grain Delivery by POS System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.