शिक्षण संचालकांकडून गटशिक्षणाधिकार्‍यांची कानउघडणी

By Admin | Updated: May 7, 2014 01:31 IST2014-05-06T19:49:06+5:302014-05-07T01:31:25+5:30

गटशिक्षणाधिका-यांकडून शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करताना हेळसांड केली जाते. त्यांनी शाळांमध्ये सुधारणा घडवून आणाव्यात आणि प्रत्यक्ष हजर राहून सर्व धोरणे प्रत्यक्षात आणावीत. अन्यथा सचिवांकडे तक्रार करण्यास मागे-पुढे पाहिले जाणार नाही, अशा शब्दांत राज्य शिक्षण-संशोधन परिषदेचे आयुक्त एन. के. जरग यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांची कानउघडणी केली.

Graduation of Education Officers from Education Directors | शिक्षण संचालकांकडून गटशिक्षणाधिकार्‍यांची कानउघडणी

शिक्षण संचालकांकडून गटशिक्षणाधिकार्‍यांची कानउघडणी

पुणे : गटशिक्षणाधिकारी हा शिक्षणव्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे. मात्र, काही अधिकार्‍यांकडून शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करताना हेळसांड केली जाते. त्यांनी शाळांमध्ये सुधारणा घडवून आणाव्यात आणि प्रत्यक्ष हजर राहून सर्व धोरणे प्रत्यक्षात आणावीत. अन्यथा सचिवांकडे तक्र ार करण्यास मागे-पुढे पाहिले जाणार नाही, अशा शब्दांत राज्य शिक्षण-संशोधन परिषदेचे आयुक्त एन. के. जरग यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांची कानउघडणी केली.
परिषदेतर्फे यंदा बदललेल्या तिसरी-चौथीच्या अभ्यासक्र माबाबत राज्यातील गटशिक्षणाधिकार्‍यांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सहसंचालिका शकंुतला काळे उपस्थित होत्या.
जरग म्हणाले, शासकीय नियम शेवटच्या स्तरापर्यंत राबविणारा गटशिक्षणाधिकारी हा महत्वाचा शासकीय घटक आहे. त्यासाठी शिक्षक आणि अधिकारी यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. या अधिकार्‍यांनी शैक्षणिक धोरण राबविले जात असताना त्याठिकाणी उपस्थित असले पाहिजे. विद्यार्थ्यांचे संगीत शिक्षण किंवा मैदानावरील प्रात्यक्षिके घेतली जात असताना त्यांची नोंद स्वत: हजर राहून करावी. अशावेळी अधिकार्‍यांची असलेली उपस्थिती शिक्षणव्यवस्थेत बदल घडवून आणण्यास महत्वाची भूमिका बजावले. अन्यथा, काहीजण केवळ मोबाईलवरून अशा नोंदी घेतात. अशी परिस्थिती धोकादायक ठरेल. कामातील या बेजबाबदारपणाची शिफारस थेट सचिवांपर्यंत करण्यात येईल. कुणाचा कुणाला मेळ नाही,अशी परिस्थिती काही वर्षांपूर्वी होती. आता ती बदलली पाहिजे.
नव्या शिक्षण व्यवस्थेत पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा नाही, असा समाजामध्ये गैरसमज आहे. परीक्षा आहेत, मात्र त्यांचे प्रकार वेगळे आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन होणार आहे. ही बाब गटशिक्षणाधिकार्‍यांनी सर्वांच्या लक्षात आणून द्यावी. पाठ्यपुस्ताकापलीकडे असलेले ज्ञान विद्यार्थ्यांपुढे मांडण्यासाठी अधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा.
याबाबत जुन्नर तालुक्याचे गटशिक्षणाकिधारी के. डी. भुजबळ म्हणाले, नव्या अभ्यासक्र मानुसार ज्ञानरचनावाद काय आहे, याची माहिती आम्हाला या प्रशिक्षणातून मिळाली. अधिकार्‍यांसाठी हा वेगळा अनुभव आहे. कामामध्ये ढिसाळपणा ठेवू नका, ही संचालकांनी केलेली सूचना योग्यच आहे.

Web Title: Graduation of Education Officers from Education Directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.