पदवीधर, शिक्षकची प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यास दुपारचे तीन वाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:29 IST2020-12-04T04:29:40+5:302020-12-04T04:29:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे विभाग विधान परिषद पदवीधर मतदार संघात ४ लाख २६ हजार २५७ मतदारांपैकी २ ...

Graduation, the actual counting of teachers will begin at three o'clock in the afternoon | पदवीधर, शिक्षकची प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यास दुपारचे तीन वाजणार

पदवीधर, शिक्षकची प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यास दुपारचे तीन वाजणार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे विभाग विधान परिषद पदवीधर मतदार संघात ४ लाख २६ हजार २५७ मतदारांपैकी २ लाख ४७ हजार ५० (५७.९६ टक्के) मतदारांनी मतदान केले, तर शिक्षक मतदार संघात ७२ हजार ५४५ मतदारांपैकी ५२ हजार ९८७ म्हणजे ७३.०४ टक्के मतदारांनी मतदान केले आहे. एकूण मतदानाची वाढलेली टक्केवारी, एकूण उमेदवारांची संख्या यामुळे पाचही जिल्ह्याची मतपत्रीका एकत्र करणे, त्यातून वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या करणे, त्यनंतर पहिल्या पसंती क्रमांकत निवडून येण्यासाठी मतांचा कोटा निश्चित करून प्रत्यक्ष पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू करण्यासाठी गुरूवार (दि.३) रोजी दुपारचे तीन चार वाजणार आहेत. तर पहिल्या फेरीत एखाद्या उमेदवाराने मतांचा कोटा पूर्ण न केल्यास उलट्या क्रमांने पसंतची मते मोजावी लागतील व मतदानाची प्रक्रिया खूपच लांबून अंतिम निकाला हाती येण्यासाठी शुक्रवारचे पाच वाजतील, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख यांनी सांगितले.

पदवीधर मतदार संघासाठी ६२ उमेदवार असल्याने ही मतपत्रिका जम्बो झाली. त्यामुळे मतपत्रिका हाताळण्यासाठीही विलंब लागणार आहे. शिक्षक मतदारसंघासाठी ३५ उमेदवार आहेत. पदवीधर साठी ४ लाख २६ हजार २५७ मतदारांपैकी २ लाख ४७ हजार पन्नास मतदारांनी मतदान केले आहे. ५७.९६ टक्के मतदान झाले आहे. शिक्षक मतदार संघ हजार ५४५ मतदारांपैकी ५२ हजार ९८७ म्हणजेच ७३.०४ टक्के मतदारांनी मतदान केले आहे. पहिल्या टप्प्यात वैध आणि अवैध मतपत्रिका वेगवेगळ्या केल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल.

बालेवाडी येथील स्टेडियममध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून , पदवीधर साठी ११२ आणि शिक्षक मतदार साठी ४२ टेबल लावले आहेत. मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदारसंघासाठी १८ हॉल, तर शिक्षक मतदारसाठी ६ हॉल आहेत. पदवीधरसाठी १२६ पर्यवेक्षक, २५२ सहायक आणि १२६ शिपायांची नेमणूक केली. ‘शिक्षक मतदार’साठी ४२ पर्यवेक्षक, ८४ सहायक आणि ४२ शिपायांची नियुक्ती केली. सुरक्षेसाठी ४५० पोलिस आहेत. अशी माहिती देशमुख यांनी दिली.

-------

मतपत्रिकांचे वजन १४ टन

पदवीधर साठी ६२ उमेदवार रिंगणात आहेत त्यासाठी जम्बो मतपत्रिका तयार केली. एका केंद्रावर आठशे ते एक हजार मतदारांची व्यवस्था होती. त्यासाठी मतपत्रिकांचा गठ्ठा दिला त्याचे वजन ३२ ते ३५ किलो झाले. पदवीधर साठी एकूण ४ लाख २६ हजार मतपत्रिका छापण्यात आल्या त्यांचे एकूण वजन १४ टन झाले. मतपत्रिकांचा ची घडी घालण्यासाठी खास कर्मचारी नेमले. मतपत्रिकेची घडी मतपेटीत घुसण्यासाठी या घडीला विशिष्ट आकार दिले होते.

Web Title: Graduation, the actual counting of teachers will begin at three o'clock in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.