पदवीधर, शिक्षकसाठी ‘हात धुवून’ मतदान करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:27 IST2020-11-26T04:27:58+5:302020-11-26T04:27:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे विभागात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी येत्या १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ...

पदवीधर, शिक्षकसाठी ‘हात धुवून’ मतदान करा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे विभागात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी येत्या १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यात सर्व मतदान केद्रांवर मतदाराना हात धुन्यासाठी साबण व पाण्याची व्यवस्था, मतदानासाठी एकाच वेळी मोठी गर्दी होऊ नये यासाठी महिला, पुरुषांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष, मतदान केद्रांवर दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर, इन्स्टिट्युशनल क्वरंटाईन मतदारांसाठी मतदानासाठी घेऊन येण्यासाठी रुग्ण वाहिकेची सोय करणे, आदी विविध उपाय-योजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख यांनी पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणू क पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने मतदान केंद्रांच्याबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवा. मतदान व मतमोजणी प्रक्रियेत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करा. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्या. मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करा. मतदान प्रक्रियेसाठी काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क,सॅनिटायझर व आवश्यक साहित्य पुरविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
निवडणूक कामकाजातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करुन आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा.
देशमुख म्हणाले, मतदान व मतमोजणी कामासाठी योग्य नियोजन करा. निवडणूकीचे काम सुरळीत होण्याच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था, खर्च व्यवस्थापन, कर्मचारी व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, वाहन अधिग्रहण व वाहतूक आराखडा, निवडणूक साहित्य मागणी व वितरण, मतदार यादी वितरण, टपाली मतपत्रिका, तक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्ष कामकाज, स्वीप कार्यक्रम, मतदारांना सोयी सुविधांची अंमलबजावणी, मतदार जनजागृती आदी विविध बाबींचा आढावा देशमुख यांनी घेतला.