पाटील महाविद्यालयाला नॅककडून ब श्रेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:19 IST2021-02-21T04:19:30+5:302021-02-21T04:19:30+5:30
बेंगलोर येथील नॅक समितीने दोन दिवसांत महाविद्यालयास भेट दिली. या समितीचे चेअरमन डॉ. सुदलाईमुथु सेथू कुलगुरू कोईमतूर तामिळनाडू, डॉ.प्रणवीर ...

पाटील महाविद्यालयाला नॅककडून ब श्रेणी
बेंगलोर येथील नॅक समितीने दोन दिवसांत महाविद्यालयास भेट दिली. या समितीचे चेअरमन डॉ. सुदलाईमुथु सेथू कुलगुरू कोईमतूर तामिळनाडू, डॉ.प्रणवीर सिंग महात्मा गांधी युनिव्हर्सिटी बिहार, डॉ.अभयकुमार परमार प्राचार्य गुजरात या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयाची पाहणी केली. या पाहणीत महाविद्यालयातील अभ्यासक्रम, अध्ययन -अध्यापन पद्धती, मूल्यमापन, संशोधन,भौतिक सोयीसुविधा, शैक्षणिक साधने, विद्यार्थ्यांसाठी अभ्यास व अभ्यासपूरक सोयीसुविधा, क्रीडा सुविधा, ग्रंथालय सुविधा, प्रशासन, विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय राबवित असलेले विविध उपक्रम, जनजागृती उपक्रम आदी सर्व उपक्रमांची तपासणी केली. या सुविधा पाहून मूल्यांकनासाठी आलेल्या नॅकच्या त्रिसदस्यीय समितीने 'ब' श्रेणी मानांकन प्रदान केले.
महाविद्यालयास ब मानांकन प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , नीरा- भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष मनोज पाटील, सचिव किरण पाटील, खजिनदार उमेश सूर्यवंशी, इंदापूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, प्रा.संदीप शिंदे यांनी प्राचार्य डॉ. लहु वावरे, सर्व प्राध्यापक यांचे अभिनंदन केले.